Reservation दिले त्यांनाच पाडण्याची भाषा; Maratha समाजात रोष!

193
Reservation दिले त्यांनाच पाडण्याची भाषा; Maratha समाजात रोष!

राज्याला गेल्या ४० वर्षात १० मराठा मुख्यमंत्री लाभले मात्र मराठा समाजाला आरक्षण (Reservation) दिले गेले ते देवेंद्र फडणवीस या एका ब्राह्मण मुख्यमंत्र्याकडून. तरीही फडणवीस हे वाईट आणि भाजपाचे आमदार पाडणार या वल्गना करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध मराठा समाजात रोष वाढू लागल्याचे दिसत आहे.

दहा मराठा मुख्यमंत्री

गेल्या ४० वर्षात म्हणजेच १९८३ पासून ते २०२३ पर्यंत महाराष्ट्राचे नेतृत्व वसंतदादा पाटील, शिवाजीराव निलंगेकर, शंकरराव चव्हाण, शरद पवार (दोन वेळा), नारायण राणे, विलासराव देशमुख (दोन वेळा), अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या दहा मुख्यमंत्र्यांनी केले. मात्र यातील एकानेही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात घिसाडघाईने आरक्षण (Reservation) दिले पण ते न्यायालयात टिकू शकले नाही.

(हेही वाचा – Mumbai Local Train : दर रविवारी मेगाब्लॉक घेवूनही सलग दुसऱ्या आठवड्यात हार्बर लाईन ठप्प)

.. तरी भाजपाचे आमदार पाडण्याची भाषा

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना (२०१४ ते २०१९) आरक्षण दिले, ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना (२०१९ ते २०२२) न्यायालयात टिकू शकले नाही. असे असतानाही जरांगे हे कायम फडणवीस यांच्यावर टीका करत असून आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या फडणवीस यांच्या पक्षाचे आमदार पाडण्याची भाषा सतत करून मराठा समाजाची दिशाभूल करीत असल्याची भावना वाढीस लागली आहे. तर उद्धव ठाकरे (सीकेपी) यांच्या कार्यकाळात आरक्षण (Reservation) टिकले नाही, त्यांच्याबद्दल एक चकार शब्द काढत नाहीत, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

(हेही वाचा – Anandacha Sidha : उत्सव तोंडावर पण… शिध्याचा ‘आनंद’ फक्त रव्यापुरताच)

शरद पवारांना सत्तेवर बसविण्यासाठीच..

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समजाला उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मदतीने आरक्षण (Reservation) मिळवून दिले, तरीही जरांगे यांनी त्यांचा लढा कायम ठेवला आहे. यामुळे जरांगे यांचा बोलविता धनी शरद पवार असल्याचे बोलले जात आहे आणि शरद पवार यांनाच सत्तेवर बसविण्यासाठीच जरांगे यांनी लढा सुरू ठेवल्याची भावना मराठा समाजात व्यक्त होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.