राज्याचे हित डोळ्यासमोर ठेवून भूमिका घ्यायला हवी, पण राजकीय स्वार्थ साधता येतो का, हे पाहिले गेले, वेगवेगळ्या समाजाकडून आरक्षण (Maratha Reservation) मागितले जात आहे, त्याच्या पूर्ततेसाठी कुणीही राज्यकर्ते प्रयत्न करत असतात पण कायद्याच्या चौकटीत ते बसले पाहिजे. वेगवेगळे निर्णय सर्वोच्च न्यायालय देत असते, त्याचा प्रभाव पडतो. फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकेल जे सर्वोच्च न्यायालयात नाकारले, पण एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत.
(हेही वाचा – Maratha Reservation : महायुती सरकारने दिलेले मराठा आरक्षण ठाकरे सरकारने घालवले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)
आज (४ सप्टेंबर) जी बैठक (Maratha Reservation) झाली त्यात सर्वांचे विचार समजून घेण्यात आले. आज वेगवेळ्या ठिकाणी एस टी बसेस जाळले जात आहेत, बंद केले जात आहे, १० कोटीचे नुकसान एस टी चे झाले हे चुकीचे आहे. याआधी जी मराठा समाजाची आंदोलने झाली त्याचे जगभरात कौतुक झाले, पण आता त्यावर गालबोट लावण्याचे काम झाले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा मंत्री गिरीश महाजन यांना जालन्यात चर्चेसाठी पाठवेल आहे. काही जण जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे खुशाल म्हणत आहेत वरून आदेश आला होता तो आरोप सिद्ध करून दाखवा. उगाच गैरसमज पसरवला जात आहे. इथून पुढच्या काळात आंदोलने थांबवा, शांततेत आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. लवकरच सण-उत्सव येत आहेत, याची जाणीव सर्वांनी ठेवावी.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community