Maratha Reservation : जालना घटनेत पोलीस नाही तर त्यांना आदेश देणारे दोषी – राज ठाकरे

197
Maratha Reservation : जालना घटनेत पोलीस नाही तर त्यांना आदेश देणारे दोषी - राज ठाकरे

राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालन्यातील आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. या आंदोलनाचे राज्यभर पडसाद उमटले आहे. जालना पाठोपाठ सोलापूर, औरंगाबाद, नागपूर आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील आंदोलक आक्रमक झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जालनामधील आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

मागे जेव्हा मराठा मोर्चे (Maratha Reservation) निघाले तेव्हाचं म्हणालो होतो, तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. हे सर्व राजकारणी तुमचा वापर करून घेतील, मत पाडून घेतील. हा मुद्दा सुप्रीम कोर्टाचा आहे. ते सतत तुम्हाला आरक्षणाचं अमिष दाखवून झुलवत ठेवणार आहे. कधी हे सत्तेत कधी ते विरोधात. सत्तेत आले की, तुमच्यावर गोळ्या झाडतात, अशा शब्दात राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.

(हेही वाचा – Maratha Reservation : मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत होणार महत्वाची बैठक)

पुढे बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, तुम्ही पोलिसांना दोष देऊ नका. पोलिसांना लाठीचार्जचे (Maratha Reservation) आदेश ज्यांनी दिले, त्यांना दोष द्या. पोलिस काय करणार? ते पण तुमच्या आमच्यातलेच आहेत. समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या नावाखाली तुमच्याकडे मतं मागितली. मी तेव्हाच सांगितलं होतं की, हे शक्य नाही. आपले गडकिल्ले सुधारले पाहिजे.

असो, मी आज तुमच्यासमोर भाषण कऱण्यासाठी आलो नाही. ज्या लोकांनी तुमच्यावर (Maratha Reservation) काठ्या आणि गोळ्या चालवल्या त्यांच्यासाठी मराठवाडा बंद करून टाका. देवेंद्र फडणवीस म्हणतात, याचं राजकारण करू नये, का करू नये, तुम्ही काय केलं असतं, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.