Maratha Reservation : दगडफेक करणारे मराठा समाजाचे नसावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

125
Maratha Reservation : दगडफेक करणारे मराठा समाजाचे नसावेत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

काही लोक जालन्यात आंदोलनस्थळी (Maratha Reservation) जात होते, ते त्यांना पाठिंबा देत आहेत असे सांगत आहेत, पण तिथे जाऊन ते सरकारला बदनाम करण्याचे काम करत होते, परंतु उपोषणाला बसलेल्यांच्या तब्येतीची विचारपूस करत नव्हते. पोलिसांवर दगडफेत करणारा मराठा समाजाचा नसावा, या आंदोलनाच्या आडून मराठा समाजाला, सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न असावा, मराठा समाजाने (Maratha Reservation) यातून सावध राहिले पाहिजे. लाठीचार्ज प्रकरणी जालन्याचे एसपी यांची बदली केली आहे, आणि या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करत आहोत, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मागील कालखंडात मराठा समाजाचे (Maratha Reservation) ५८ मोर्चे लाखांच्या संख्येने निघाले, ते अतिशय शिस्तबद्धपणे झाले. मराठा समाज शिस्तप्रिय आहे त्याचा अनुभव आपल्याला आला आहे. पण आंदोलनाच्या मागून काही लोक महाराष्ट्रात शांतात बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यापासून मराठा समाजाच्या तरुणांनी सतर्क राहिले पाहिजे. जे उपोषण करत आहेत, त्यांची काळजी सरकारला आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी पोलीस तिथे गेले आणि दुर्दैवी प्रकार तिथे झाला. सरकार याबाबत गंभीर आहे. आपण दिवस रात्र यासाठी काम केले आहे. उच्च न्यायालयात आरक्षण टिकवण्याचे काम केले. सर्वोच्च न्यायालयात काही जण गेले, सरकार बदलल्यावर ते आरक्षण रद्द झाले. त्यावेळी उप समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण होते. तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी निर्णय का घेतले नाही. आमची भूमिका प्रामाणिक आहे. त्यावेळीच सरकार योग्य निर्णय घेऊ शकले नाही आणि सर्वोच्च न्यायालयासमोर मराठा समाज मागास आहे हे त्यावेळीच सरकार सिद्ध करू शकले नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही (Maratha Reservation) मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाकारल्यावर ३५०० मुलांच्या नोकऱ्यांवर गदा आली त्यांना आम्ही समाविष्ट करून घेतले.

(हेही वाचा – Maratha Reservation : लाठीचार्जचा आदेश मंत्रालयातून आल्याचे सिद्ध करून दाखवा – उपमुख्यमंत्री अजित पवार)

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळाले पाहिजे, ते कायद्याने टिकले पाहिजे यासाठी आमचे सरकार आग्रही आहे. आम्ही यासाठी टास्क फोर्स तयार केला आहे त्यात मोठे वकील आहेत, सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी काढल्या आहेत त्या दूर करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करत आहे, पण थोडा संयम मराठा समाजाने राखला पाहिजे. मराठा समाज मागास आहे, हे सिद्ध करावे लागणार आहे त्यावर आम्ही काम करत आहोत. सरकार पूर्णपणे, प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी प्रयत्नरत आहे. तोवर ओबीसी समाजाला जे फायदे होतात ते मराठा समाजाला मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. चुकीच्या पद्धतीने जे गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाच्या आंदोलनावर लाठी चार्ज करण्याचा आदेश आम्ही देऊ शकतो का?

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.