Maratha Reservation : …तर आरक्षणाची गरज भासणार नाही – बच्चू कडू

156
Maratha Reservation : ...तर आरक्षणाची गरज भासणार नाही – बच्चू कडू
Maratha Reservation : ...तर आरक्षणाची गरज भासणार नाही – बच्चू कडू

मराठा हे मुलखाचे नाव आहे. जातीचे नाव नाही. मराठा हे कुणबीच होते. (Maratha Reservation) शिवाजी महाराजांच्या काळात मराठे आले म्हणजे ‘अठरापगड जातीचे एकत्र लढणारे सैनिक आले’ असा अर्थ होता. मराठा हे ध्येयाचे व गर्वाचे नाव होते. कुणबी म्हणजे शेतकरी होते. मराठा समाजाला आरक्षण देण्याची साधी, सरळ, सोपी गोष्ट होती; ती आता अवघड करून ठेवली गेली आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या किंवा ओबीसी म्हणून द्या नाही तर कुणबी आहेत, असे समजून परिपत्रक काढायला काहीच हरकत नाही. शेतीविषयक धोरण ठरवले गेले, तर आरक्षणाची गरजही भासणार नाही, असा सल्ला आमदार बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. दिव्यांग कल्याण व समाजकल्याण विभागाच्या वतीने नगरमध्ये आज, मंगळवारी ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी बच्चू कडू उपस्थित होते. त्या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

(हेही वाचा – Retail Inflation : ऑगस्ट महिन्यात देशाचा किरकोळ महागाई दर ६.८३ टक्क्यांवर)

आमदार बच्चू कडू म्हणाले की, आरक्षण शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे, सर्वाना शिक्षण मोफत मिळाले. शेतीवर भर दिला. गावातील तरुणांना ताकत दिली, तर तो तुमच्याकडे आरक्षण मागायला येणार नाही. आरक्षण फेकून देईल, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आरक्षणाच्या मुद्दय़ावर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. अशा प्रकारच्या विशेष अधिवेशनाची गरज नाही. सर्व आमदारांकडून त्यांचे म्हणणे काय आहे याबाबत दोन पानी पत्र मागवा, मते मागवा अन्यथा जो समाज आम्हाला भेटेल त्याबद्दल आम्ही गोड गोड बोलतो.

विषमतेमुळे उद्या आमदार, खासदारांची घरे लुटली जातील

शेतीविषयक धोरण ठरवले न गेल्याने पूर्वी उत्तम असलेली शेती आता दुय्यम ठरली आहे. नोकरी उत्तम झाली आहे, जो काम करतो त्याला पगार मिळतो आणि जो काम करत नाही त्यालाही तेवढाच पगार मिळतो. कष्टकऱ्यांसारखे कौशल्य आमदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे नसते. परंतु  कष्टकऱ्याला किती पैसे मिळतात ? त्या तुलनेत आमदार, जिल्हाधिकाऱ्यांना किती मिळतात ? एक इमारत बांधणारा गवंडी आणि या इमारतीवर एक नजर टाकून जाणारा इंजिनीअर यांना मिळणारे वेतन ही विषमता वाढवत आहे. या विषमतेमुळे उद्या आमदार, खासदारांची घरे लुटली जातील, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. (Maratha Reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.