महाविकास आघाडीचे सरकार असतांना, मुख्यमंत्री असतांना उद्धव ठाकरे यांनी (Maratha Reservation) मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला. त्यांच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न डॅमेज करण्यात आला. आता त्यांना या प्रश्नावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी आक्रमक टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
शनिवारी ते चिखली (जि. बुलढाणा) व छ. संभाजी नगर येथे माध्यमांशी बोलत होते. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयावरून राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर त्यांनी आपले मत प्रगट केले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की; “देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे साठ मोर्चे निघाले. त्यावेळी कुठेही सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले नाही. कुठेही गालबोट लागले नाही. मात्र शुक्रवारी (१ सप्टेंबर) या प्रकरणास गालबोट लागले. यामुळे या घटनेची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मराठा समाजास संयमी आहे. मराठा समाजाने नेहमीच्या राज्याला प्रगतीकडे नेले आहे, असेही ते म्हणाले.
(हेही वाचा – Jalna Maratha Andolan : आंदोलनकर्त्यांनी १९ बसेस पेटवल्या; एसटी महामंडळाचे ४ कोटींचे नुकसान)
सकल मराठा समाजाची (Maratha Reservation) मागणी नेहमीच सकारात्मक राहिली आहे. फडणवीस सरकारने मराठा आरक्षण उच्च व सर्वोच्च न्यायालयात टिकविण्यासाठी प्रयत्न केले. उद्धव ठाकरे यांना सरकारमध्ये असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न योग्य प्रकारे हाताळता आला नाही. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा समाजाचे दोन मोठे नेते सरकारमध्ये आहेत, त्यांच्यासोबतीला देवेंद्र फडणवीस यांचाही अनुभव आहे. यावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी भाजपा मराठा समाजाच्या व मागणीच्या पाठीशी आहे.
मराठा समाजाची दिशाभूल केली
उद्धव ठाकरे हे केवळ फेसबुकवर राहणारे नेते आहेत, आता ते बावचळलेल्या अवस्थेतून बाहेर येत आहेत. सरकार असताना त्यांनी हा (Maratha Reservation) प्रश्न सोडविला नाही, तेव्हा ते झोपले होते का? मराठा समाजात आजही आर्थिक दुर्बल घटक आहेत. त्यांना मदत करण्याची गरज आहे. विजय वेडेट्टीवार यांनी आरक्षणाची मागणी करणे योग्य असले तरी आताच्या सरकारवर त्यांची टिप्पणी करण्याची योग्य वेळ नाही, असेही बावनकुळे यावेळी म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community