मागील काही महिन्यांपासून (Maratha Reservation) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच शनिवार १६ डिसेंबर रोजी नांदेड येथील उद्धव ठाकरे यांची पूर्वनियोजित बैठक मराठा सकल कार्यकर्त्यांनी उधळून लावली.
(हेही वाचा – Lok Sabha Intrusion : पंतप्रधान मोदींनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..)
नेमका प्रकार काय ?
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवार १६ डिसेंबर रोजी दुपारी नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे एक बैठक होणार होती. मात्र सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून (Maratha Reservation) ही बैठक उधळून लावण्यात आली. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांना शासकीय विश्रमगृहात बैठक किंवा कोणतेही कार्यक्रम घेता येणार नाही असा निर्धार मराठा कार्यकर्त्यांनी केला आहे.
(हेही वाचा – Khalistan Protest : कॅनडामध्ये खलिस्तानी समर्थकांकडून तिरंग्याचा अपमान; भारतीय दुतावासाबाहेर निदर्शने)
भाजपचीही बैठक उधळली
उद्धव ठाकरे यांच्या बैठकेपूर्वी सकल मराठा कार्यकर्त्यांकडून (Maratha Reservation) भाजपची बैठक देखील उधळून लावण्यात आली होती. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व शासकीय कार्यक्रम आणि राजकीय पक्षाच्या बैठकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे.
मराठा समाजाकडून (Maratha Reservation) याआधी राजकीय नेत्यांना गावबंदीचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी त्यांचा हा निर्णय मागे घेतला. मात्र शासकीय कार्यक्रम आणि बैठकांवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर ते ठाम असल्याचे दिसून येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community