Maratha Reservation : वंचितचा मराठा मतांवर डोळा?

जरांगे पाटील यांनी आज गुरुवारी सहाव्या दिवशीही अन्न-पाणी त्याग करत उपोषण सुरू ठेवले असून उपचार घेण्यासही त्यांनी नकार दिला आहे. शासनाने या उपोषणाची दखल घेतली नसल्याचे दिसून येते. जरांगे यांची तब्बेत दिवसेंदिवस खालवत असून समाजाच्या भावना तीव्र होत आहेत.

237
Maratha Reservation टिकणार का?
Maratha Reservation टिकणार का?

मराठा आरक्षण (Maratha Reservation) लढ्यातील नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आरक्षणासाठी उपोषण सुरू केले असून सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याच्या भावनेला हवा देत वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Maratha Reservation)

समाजाच्या भावना तीव्र

जरांगे पाटील यांनी आज गुरुवारी सहाव्या दिवशीही अन्न-पाणी त्याग करत उपोषण (Hunger Strike) सुरू ठेवले असून उपचार घेण्यासही त्यांनी नकार दिला आहे. शासनाने या उपोषणाची दखल घेतली नसल्याचे दिसून येते. जरांगे यांची तब्बेत दिवसेंदिवस खालवत असून समाजाच्या भावना तीव्र होत आहेत. या भावनांना सहानुभूति (Sympathy) दाखवून, हवा देत मराठा समाजाची मते वंचित आघाडीकडे वळविण्याचा (Diversion of Vote) प्रयत्न सुरू झाल्याचे समजते. (Maratha Reservation)

लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवावी

“आम्ही जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे की, त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही. उपोषणातून जागृती करायची होती, ती झाली आहे. आता आरक्षण मिळविण्याचा भाग आहे असं आम्ही मानतो. म्हणून, जरांगे पाटील यांनी येत्या लोकसभेत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथील लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली पाहिजे,” असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत सांगितले. (Maratha Reservation)

जरांगे विनंती मान्य करतील?

“ओबीसींच्या ताटात मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, तसं झालं तर टिकणारे आरक्षण मिळणार नाही. म्हणून गरीब मराठ्यांचे ताट आणि ओबीसींचे ताट वेगळं असावं अशी आमची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मनोज जरांगे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून (Jalna Lok Sabha constituency) उमेदवारी जाहीर करावी. ते निवडून येतील, अशी आम्हाला खात्री आहे. लोकसभेच्या निमित्ताने गरीब मराठ्यांचा प्रश्न सोडवण्यात येतो हे आम्ही त्यांना सांगणार आहोत. ते मान्य करतील,” अशी अपेक्षाही आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. (Maratha Reservation)

(हेही वाचा – Veterinary Hospital : महालक्ष्मीतील पशुवैद्यकीय रुग्णालय एप्रिल महिन्यात होणार सुरु)

“मेलो तर असंच सरकारच्या दारात नेऊन टाका”

जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देत, ‘मी जर मेलो तर मला असंच सरकारच्या दारात नेऊन टाका. मी मेल्यावर या सरकारला सोडू नका. येत्या १८ किंवा १९ फेब्रुवारीपर्यंत आरक्षण दिलं नाही तर आपण मुंबईला जाऊ.’ असा इशाराही त्यांनी दिला. जरांगे पाटलांनी काही झाल्यास याला सरकार जबाबदार असल्याचं मराठा बांधवांकडून सांगण्यात येत होतं. (Maratha Reservation)

२० फेब्रुवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

राज्य सरकारने राज्यपाल (Governor) रमेश बैस यांना मंगळवारी, २० फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन (special session) बोलावण्याची शिफारस केली आहे. काल १४ फेब्रुवारीला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतच प्रस्ताव एकमताने मंजूर करून राज्यपालांकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावाला राज्यपालांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर २० फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षण विषयावर एक दिवसीय विशेष अधिवेशन आयोजित करण्यात येईल. (Maratha Reservation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.