पुण्यात नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यात लेखक नामदेव जाधव हे भांडरकर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले. तसेच त्यांना मारहाणदेखील करण्यात आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले आहे.
काय म्हणाले नामदेव जाधव?
नामदेव जाधव म्हणाले, शरद पवार मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) कधीही स्पष्ट भूमिका घेत नाहीत. जेव्हा मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न पुढे येतो तेव्हा मुस्लिम समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असे म्हणतात. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या, असे ते कायम का म्हणतात? मराठा समाजाचे म्हणणे आहे जो आमचा हक्क आहे तो आम्हाला द्या. आम्हाला कुणाच्या हक्कांवर गदा आणायची नाही. ज्यावेळी शालिनीताई पाटील या विषयावर आक्रमक झाल्या होत्या तेव्हा शरद पवारांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.
मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सर्वात मोठा तात्विक, वैचारिक आणि कायदेशीर विरोध शरद पवारांनी केला. आमचे दुर्दैव हे आहे की शरद पवारांनी मराठा म्हणून सगळीकडे मिरवले आणि मराठ्यांचीच जिरवली. इंग्रजी वर्तमान पत्रांमध्ये जेव्हा बातम्या येत तेव्हा स्ट्राँग मराठा मॅन असे मथळे यायचे. दिल्लीत मराठा म्हणून मिरवायचे आणि महाराष्ट्रात मराठा म्हणून मराठ्यांची जिरवायची हे दुटप्पी वागणे आहे. व्ही.पी. सिंग यांना मंडल आयोगाचे श्रेय जाणार होते, त्याआधी घाईने हा निर्णय शरद पवारांनी घेतला आणि मराठ्यांचे नुकसान केले, असा आरोप नामदेव जाधव यांनी केला.
Join Our WhatsApp Community