मराठा समाज आक्रमक, राऊतांचे पोस्टर्स जाळून ‘स्वराज्य संघटने’चे शिवसेना भवनासमोर आंदोलन

231

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मराठा समाज अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. स्वराज्य संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मराठा मोर्चाचा व्हीडिओ वापरल्याप्रकरणी सोमवारी सकाळी १० वाजेच्या दरम्यान शिवसेना भवनाबाहेर राऊतांविरोधात तीव्र आंदोलन केले. यावेळी संजय राऊतांविरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी त्यांचे पोस्टर्स फाडून ते जाळले.

काय आहे प्रकरण

संजय राऊत यांनी रविवारी महाविका आघाडीचा महामोर्चा असल्याचा दावा करत एक व्हिडिओ अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला होता. मात्र हा व्हिडिओ मराठा क्रांती मोर्च्याचा असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राऊतांनी खोटेपणा करत मराठा मोर्च्याचा व्हिडिओ वापरल्याचा आरोप करत मराठा संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत.

मुंबईत सोमवारी सकाळी शिवसेना भनवाबाहेर चौकात राऊतांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पोस्टर जाळण्यात आले. स्वराज्य संघटनेचे नेते अंकुश कदम यांनी राऊतांविरोधात घणाघाती टीका केली. यावेळी त्यांनी मराठा क्रांती मोर्च्याच्या मूक मोर्च्याला हिणवणाऱ्या राऊतांनी आमच्या मोर्च्याचा व्हीडिओ का वापरला, याचा जाब त्यांना विचारला जावा, अशी मागणीही केली.

संभाजीराजेंनी दिला इशारा

राऊतांच्याविरोधात स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी ट्विटवरून तीव्र संताप व्यक्त केला. ज्या मोर्च्याला तुम्ही मुका मोर्चा म्हणून हिणवलं तोच मराठा क्रांती मोर्चा आज स्वतःच्या राजकारणासाठी वापरताय. या मोर्च्याची चेष्ठा कऱणारेही तुम्हीच होता. आज नसलेली ताकद दाखवताना जरा तरी तमा बाळगा, असा इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.