अभिनेत्री केतकी चितळेच्या न्यायालयीन कोठडीत आता आणखी वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच रबाळे पोलीस स्थानकात तिच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, या प्रकरणात आता केतकी चितळे जामीन अर्ज दाखल करणार आहे. आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये तिला जामीन मिळालेला नाही. या प्रकरणी केतकीला ठाणे येथील विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी तिला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती, त्यानंतर आता तिच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली असून तिला ७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
(हेही वाचा – केतकीला झालेला ‘एपिलेप्सी’ आजार नेमका आहे तरी काय?)
अभिनेत्री केतकी चितळेविरोधात वर्ष २०२० मध्ये अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार, तिच्याविरोधात गुन्हा दाखल होता. केतकीने सोशल मीडियावर अनुसूचित जाती जमातींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्ट प्रकरणी अॅड. स्वप्नील जगताप यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर याता रबाळे पोलिसांनी कारवाई करत तिला ठाणे कारागृहातून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community