काश्मीरच्या नंदनवनात साकारणार मराठी पुस्तकांचे गाव ; Uday Samant यांची माहिती

काश्मीरच्या नंदनवनात साकारणार मराठी पुस्तकांचे गाव ; Uday Samant यांची माहिती

73
काश्मीरच्या नंदनवनात साकारणार मराठी पुस्तकांचे गाव ; Uday Samant यांची माहिती
काश्मीरच्या नंदनवनात साकारणार मराठी पुस्तकांचे गाव ; Uday Samant यांची माहिती

अभिजात दर्जा प्राप्त झालेल्या मराठी भाषेतील वाचन संस्कृती समृद्ध व्हावी या दृष्टिकोनातून आता परराज्यात देखील पुस्तकांचे गाव योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात येणार असून त्याची सुरुवात काश्मीर येथून होणार आहे. या अगोदर भिलार व विस्तार योजनेतील ज्या गावांना पुस्तकांचे गाव करण्याचे योजना आखण्यात आली आहे. या धर्तीवरच परराज्यात देखील पुस्तकांचे गाव उभारणी करून वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी, या दृष्टिकोनातून ही योजना अमलात आणणार आहे. (Uday Samant)

पूर्वतयारी सुरु
मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या अध्यक्षतेखाली काश्मीरमध्ये पुस्तकांचे गाव निर्माण करण्याबाबत व बैठक घेण्यात आली. परराज्यात देखील अशा पुस्तकांच्या गावांची निर्मिती व्हावी, असे मत या प्रसंगी मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी व तिची जोपासना व्हावी या दृष्टिकोनातून हे पाऊल अत्यंत स्तुत्य आहे असे उदय सामंत यांनी या प्रसंगी मत व्यक्त केले. याबाबत उदय सामंत संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनेनुसार 2 मे 2025 रोजी काश्मीरमधील गावाचे औपचारिक उद्घाटन व घोषणा करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असून याची पूर्वतयारी सुरु कऱण्यात आली आहे. (Uday Samant)

महाराष्ट्र बाहेर पुस्तकांच्या गावाची निर्मिती
सदर संबंध प्रक्रियेत सरहद पुणे ही संस्था जबाबदारी घेणार असून राज्य मराठी विकास संस्था व सरहद संस्था या दोघांमध्ये एक करार करण्यात येणार आहे. या करारानंतर मराठीच्या जतन संवर्धनासाठी अनेक उपक्रम राज्य मराठी विकास संस्था व सरहद संस्था या दोघांच्या मदतीने काश्मीरमध्ये राबवले जाणार आहेत. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून महाराष्ट्र बाहेर देखील पुस्तकांच्या गावाची निर्मिती होऊन वाचन संस्कृती वाढवून त्या राज्यांमध्ये अनुवाद केलेले पुस्तक, स्पर्धा परीक्षांचे पुस्तक व मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेतील पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सदर योजन पर राज्यामध्ये ही अमलात आणण्यासाठी उदय सामंत यांनी अत्यंत सकारात्मकता दर्शवली असून याची कार्यप्रणाली आखण्याचे काम मराठी भाषा विभाग व राज्य मराठी विकास संस्था या स्तरावर सुरू आहे. (Uday Samant)

उदय सामंत काय म्हणाले?
अभिजात दर्जा प्राप्त झालेल्या मराठी भाषेतील वाचन संस्कृती समृद्ध व्हावी या दृष्टिकोनातून आता परराज्यात देखील पुस्तकांचे गाव योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात येणार असून त्याची सुरुवात काश्मीर येथून होणार आहे. परराज्यात अशी योजना राबविणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य असणार आहे. पुण्यातील संजय नहार यांच्या सरहद संस्थेच्या सहकार्यातून हा प्रकल्प साकारला जाणार आहे. काश्मीर मधील बंदीपूर जिल्ह्यातील “आरागाम” येथे पुस्तकांचे गाव योजनेच्या माध्यमातून मराठी भाषा पोहोचविण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. मराठी पुस्तक, मराठी ग्रंथालय, मराठीचे हिंदी,उर्दू, इंग्रजी या भाषांमध्ये भाषांतरीत झालेली पुस्तक काश्मीरच्या खोऱ्यात या योजनेच्या माध्यमातून पोहोचवण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे. “आरागाम” येथे 2 मे 2025 रोजी पुस्तकांचे गाव योजनेचा शुभारंभ राज्य सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी ट्विट केली. (Uday Samant)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.