राज्यभरात मोठ्या उत्साहात हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत ट्विट करत महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. “गुढी पाडव्याच्या या मंगल प्रसंगी आपणां सर्वांना माझ्या शुभेच्छा” अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी महाराष्ट्रवासीयांना दिल्या आहेत.
( हेही वाचा : दिल्लीसह उत्तरभारतात भूकंपाचा धक्का! ६.६ रिश्टर स्केल तीव्रता; केंद्र अफगाणिस्तान)
पंतप्रधान मोदींचे ट्विट
गुढी पाडव्याच्या या मंगल प्रसंगी आपणां सर्वांना माझ्या शुभेच्छा, हा गुढीपाडवा सर्वांना आनंददायी जावो! येणारे वर्ष समृद्धीचे आणि तुमच्या सर्व आशा आकांक्षांच्या पूर्ततेचे जावो. येणाऱ्या वर्षात सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी येवो. समाजात एकतेची भावना वाढीस लागो. अशा शुभेच्छा मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेला ट्विट करत दिल्या आहेत.
https://twitter.com/narendramodi/status/1638373234948341761
पाडवा म्हणजे नव निर्मितीचा आरंभ होण्याचा दिवस असतो. पाडव्याला वर्षारंभीच सर्वांचे आशीर्वाद घ्यायचे आणि आपली कर्तव्ये करण्यास सुरुवात करायची असते. यात अनेक गोष्टी येतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेताची मशागत करून ठेवणे, पाऊस यदा कदाचित कमी झालाच तर त्याची सोय म्हणून विहिरी, पाट, तलाव यांची नीट सोय करून ठेवणे, दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन धान्य, चारा यांची साठवण करून ठेवणे. बी बियाणे आणून ठेवणे अशी कामे पावसाळयापूर्वी उरकून ठेवायची असतात. तर नव्या गोष्टींचा आरंभ या दिवशी करतात.
Join Our WhatsApp Community