मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी बुधवारी (२६ जून) लोकसभेत केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अभिनंदन प्रस्तावावर मराठीतून बोलताना तटकरे यांनी ही मागणी केली. (Sunil Tatkare)
भाजपचे उमेदवार ओम बिर्ला यांची बुधवारी लोकसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाली. सत्ताधारी आघाडीच्या बाजूने संख्याबळ असल्याने एनडीएचे उमेदवार अध्यक्षपद राखू शकले. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ओम बिर्ला यांचे पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अभिनंदन केले. मोदी आणि गांधींनी अध्यक्षपदांना त्यांच्या खुर्चीपर्यंत सोबत केली आणि त्यांच्या साक्षीने ओम बिर्ला यांनी खूर्ची स्वीकारली. (Sunil Tatkare)
(हेही वाचा – Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात १ दहशतवादी ठार, चकमक सुरूच)
त्यानंतर संसदेतील विविध पक्षांच्या प्रतोतांनी ओम बिर्ला यांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध पक्षांचे नेते हिंदी आणि इंग्रजीतून बोलत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मराठी भाषेतून आपले मनोगत व्यक्त केले. तटकरे यांच्या शेजारी सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले बसले होते. उदयनराजे छत्रपतींचे तेरावे वंशज असल्याचा उल्लेख करत तटकरे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात यावा अशी मागणी कामकाजाच्या पहिल्याच दिवशी करून टाकली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वार विश्वास व्यक्त करत तटकरे यांनी मराठीला नक्कीच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल असा विश्वास व्यक्त केला. (Sunil Tatkare)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community