-
खास प्रतिनिधी
उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये (मनसे) सुरू झालेला मराठी-अमराठी असा रंगलेला वाद आगामी महापालिका निवडणुकीत प्रमुख मुद्दा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाल्यास मराठी मते राज ठाकरे यांच्याकडे वळण्याची शक्यता असून अमराठी हिंदू मते भाजपाच्या वाट्याला गेली तर आश्चर्य वाटू नये. यात मोठे नुकसान शिवसेना उबाठाचे (UBT) होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
हिंदू, मुस्लिमांची शिवसेना उबाठाकडे पाठ
वक्फ सुधारणा विधेयकाला शिवसेना उबाठाने (UBT) लोकसभा आणि राज्यसभेत विरोध करून मुस्लिम समाजाच्या बाजूने भूमिका घेतली. गेल्या लोकसभा निवडणुकीत उबाठाने हिंदुत्व सोडले आणि त्यांना मुस्लिम समाजाची मोठ्या प्रमाणावर मते मिळाली. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत उबाठाला हिंदु नाराजीचा फटका बसला. त्यावेळी हिंदू तसेच मुस्लिम मतदारांनी उबाठाकडे पाठ फिरवली. परिणामी २०१९ मध्ये ५६ आमदार निवडून आलेल्या उद्धव ठाकरे यांना केवळ २० आमदार निवडून आणता आले. त्या २० मध्ये १० मुंबईतील असून उर्वरित महाराष्ट्रात केवळ १० आमदार पक्षाला मिळाले.
(हेही वाचा – पुण्यात Excise Department मालामाल; सरकारच्या तिजोरीत कोटींचा महसूल जमा )
तेलही गेले आणि तूपही गेले
आता शिवसेना उबाठाने (UBT) मराठी, अमराठी किंवा मनसेविरुद्ध अशी कोणतीही भूमिका घेतली तरी हिंदू मते उबाठापासून दूर जाण्याची शक्यता आहे. थोडक्यात, ‘तेलही गेले आणि तूपही गेले, हाती आले धुपाटणे’ अशी काहीशी अवस्था उबाठाची होऊ शकते, असे व्यथा शिवसेना उबाठाच्या एका कार्यकरट्याने व्यक्त केली.
‘भैय्ये’मुळे वाद चिघळणार!
उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी नुकतीच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून मनसेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी केली आहे. मनसेकडून उत्तर भारतीयांना त्रास दिला जात असल्याचा आरोप शुक्ला यांनी आपल्या याचिकेत केला आहे. यावरून मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेत ‘असे असेल तर उत्तर भारतीयांना मुंबई-महाराष्ट्रात राहू द्यायचे की नाही याचा विचार करावा लागेल,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच उत्तर भारतीयांना देशपांडे यांनी ‘भैय्ये’ असे संबोधल्याने वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (UBT)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community