देशाची राजधानी दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनातील प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव दिले जाणार आहे. यामुळे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Marathi Sahitya Sammelan)
(हेही वाचा- Shubman Gill : शुभमन गिलसह गुजरात टायटन्सच्या ४ खेळाडूंना पोलिसांचं समन्स)
तालकटोरा स्टेडियम येथील संमेलन स्थळी एका द्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे. साहित्य महामंडळाची बैठक शुक्रवारी (३ जानेवारी) मुंबईत बोलाविण्यात आली होती. यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव एका प्रवेशद्वाराला देण्याचा निर्णय घेण्यात आला. साहित्य संमेलन फेब्रुवारी महिन्यात 21 ते 23 असे तीन दिवस होणार आहे. याआधी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असताना त्यांचे नाव घेतले गेले नाही, यामुळे वीर सावरकरांच्या अनुयायांमध्ये नाराजी होती. ती नाराजी यावेळी दूर करण्यात आल्यामुळे सावरकर प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सरहद संस्थेने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 98 वे साहित्य संमेलन दिल्लीत आयोजित केले आहे. तयारीचा आढावा घेण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. यातच एका प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याचे ठरले. (Marathi Sahitya Sammelan)
संमेलनाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. साहित्य संमेलनाचे स्थळ, प्रवेशद्वार किंवा व्यासपीठाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी अनेक सावरकरप्रेमींनी साहित्य महामंडळ व आयोजकांकडे केली होती. या मागणीची अखेर दखल घेण्यात आली असून संमेलनाच्या एका प्रवेशद्वाराला सावरकरांचे नाव देण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान दिल्लीत होणाऱ्या या संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी साहित्य महामंडळ, महामंडळाच्या घटक संस्था व सरहद या आयोजक संस्थेची संयुक्त बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. यावेळी संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. (Marathi Sahitya Sammelan)
(हेही वाचा- Chess Blitz World Cup : कार्लसन, नेपोमिनियाची यांच्या संयुक्त विजेतेपदावर जगभरात टिकेची झोड)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची साहित्य संपदा
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला 10 हजार पाने दिली. 12 हजार ओळींचे साहित्य आणि कविता दिल्या आहेत. ज्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांनीच 1857 च्या युद्धाला पहिले स्वातंत्र्ययुद्ध घोषित केले आणि त्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘जोसेफ मॅझिनी’ या चरित्राचा अनुवादही केला, ज्याची प्रस्तावना क्रांतिकारकांची गीता मानली गेली. याशिवाय ‘ज्योस्तुते’ सारखी उत्कृष्ट रचनाही स्वातंत्र्यवीर सावरकरांची होती. याशिवाय उर्दूतील गझल हाही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेल्या साहित्यसंपत्तीचा एक भाग आहे. 23व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानीही या साहित्य खजिन्याचा आणि स्वातंत्र्यप्राप्तीसाठी केलेल्या महान कार्याचा गौरव करण्यात आला. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये 94 वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असताना त्यांचे नाव घेतले गेले नाही, यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनुयायांमध्ये नाराजी होती. ती नाराजी यावेळी दूर करण्यात आल्यामुळे सावरकर प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Marathi Sahitya Sammelan)
हेही पहा-