
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या वर्षी २०२५ ला दिल्लीत २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून संमेलनाचे आयोजन पुणे येथील ‘सरहद’ या संस्थेने केले आहे. दरम्यान संमेलनाच्या आयोजनाविषयी दि. १९ डिसेंबर रोजी स्वागताध्यक्ष शरद पवार आणि आयोजक संजय नहार (sanjay nahar) यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. त्यावेळी संमेलनाच्या माहिती पत्रिकेवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (Veer Savarkar) छायाचित्र नसल्याने वादाला तोंड फुटले आहे.
साहित्य संमेलनासाठी तयार करण्यात आलेली माहितीपत्रिका पत्रकार परिषदेत वितरीत करण्यात आली. यावेळी पत्रिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), राजर्षी शाहू महाराज, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सी. डी. देशमुख, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची छायाचित्रे आहेत. यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र का नाही, असा प्रश्न विचारला असता आयोजक संजय नहार म्हणाले, महाराष्ट्रात दोन वैचारिक गट होते – जहाल आणि मवाळ. त्यामुळे पत्रिकेमध्ये मवाळ गटाचे गोपाळकृष्ण गोखले आणि जहाल गटाचे लोकमान्य टिळक यांची छायाचित्रे घेण्यात आली आहेत. म्हणून जहाल गटाचे नेते स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantrya Veer Savarkar) यांचे छायाचित्र नसल्याचे अजब स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच आमची भूमिका केवळ आयोजनाची असून अन्य विषयांची जबाबदारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची आहे, अशी भूमिका यावेळी शरद पवार यांनी घेतली. त्याचबरोबर शरद पवार म्हणाले, साहित्य संमेलनाच्या उद्धघाटनाचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देण्यात आले आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून निश्चिती मिळालेली नाही, येत्या दोन ते तीन दिवसात पंतप्रधान कार्यालयाकडून निश्चिती येऊ शकते, असे पवार यांनी सांगितले आहे. (Veer Savarkar)
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नावचं साहित्य संमेलनातून गायब
दरम्यान नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे. मुख्य प्रवेशद्वारास लोकमान्य टिळक यांचे तर व्हिआयपी प्रवेशद्वारास थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात आले आहे. सभागृह क्रमांक १ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सभागृह क्रमांक २ ला यशवंतराव चव्हाण सभागृह असे नाव दिले आहे. त्याचप्रमाणे दोन व्यासपीठांना अनुक्रमे काकासाहेब गाडगीळ आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची नावे देण्यात आली आहेत. परंतु यापैकी कुठेही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Veer Savarkar) नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. (Veer Savarkar)
२०२१ लाही वीर सावरकारांचे नाव सभामंडपाला देण्यास नकार
२०२१ मध्ये नाशिक येथे साहित्य संमेलनाची सांगता झाली. त्यावेळी सभामंडपाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव न दिल्याने वाद निर्माण झाला होता. मुळात नाशिक येथील भगूर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान आहे. त्यामुळे नाशिक नगरीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या सभामंडपाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव द्यावी, अशी मागणी राष्ट्रप्रेमींनी केली होती. मात्र त्यावेळी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी सभामंडपाला कुसुमाग्रजांचे नाव देण्याचे अगोदरच ठरले होते, असे सांगून सावरकर आमच्यासाठी आदर्श आहेत, अशी भूमिका घेतली होती. योगायोगाने त्या साहित्य संमेलनावेळीही उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळीही शरद पवार तिथे उपस्थित होते. आणि त्यांनी या घटनेचे समर्थन केले होते. (Veer Savarkar)
२०२० मध्येही स्वातंत्र्यवीर सावरकारांचा अपमान
२०२० ला उस्मानाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनाआधी भोपाळमध्ये काँग्रेस सेवा दलाने प्रशिक्षण शिबिरात सावरकरांबद्दल (Veer Savarkar) आक्षेपार्ह टिप्पणी असलेली पुस्तिका वाटण्यात आली होती. त्यावेळी संमेलनात पुस्तिकेच्या निषेधाचा ठराव घ्यावा, अशी मागणी राष्ट्रप्रेमींनी केली होती. पण त्यावेळी असा ठराव घेतल्यास आम्ही साहित्य संमेलनाचा निषेध करू, असा इशारा काँग्रेसने दिला होता.
Join Our WhatsApp Community