गुजरात-महाराष्ट्राच्या (Gujarat-Maharashtra) सीमावर्ती भागात नगरपालिका निवडणूक (Sonargad Municipal Election) पार पाडली. या निवडणुकीचे १८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाले. दरम्यान, गुजरातच्या या सोनगड नगरपालिका निवडणुकीत मराठी भाषिकांचा डंका वाजला आहे. सोनगड नगरपालिकेच्या निवडणूक निकालात १२ मराठी भाषिक नगरसेवक (Gujarat 12 Marathi corporators) म्हणून निवडून आले आहेत. यामध्ये भाजपाने एक हाती सत्ता मिळवली आहे. तर काँग्रेस पक्षाला फक्त दोन जागेवर समाधान मानावे लागले. तसेच पाच नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले आहेत. (Marathi)
तापी जिल्ह्यातील सोनगड नगरपालिकेच्या (Songad Municipality) सात प्रभागांची मतमोजणी शांततेच्या वातावरणात पार पडली. सोनगड नगर पालिका निवडणुकीत भाजपाने पुन्हा भगवा फडकावला. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी सत्ता, डीजे आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष केला. सोनगड नगरपालिकेच्या 7 प्रभागातील 28 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने 26 तर काँग्रेसने 2 जागांवर विजय मिळवला. यामध्ये 5 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले आहेत. काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा पडल्याने विरोधकांची भूमिका निश्चित झाली आहे. सध्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर मिठाई भरवत विजय उत्साह साजरा केला. ढोल ताशांचा गजरात गुलालाची उधळण करून भाजपाच्या नगरसेवकांनी आनंद उत्सव साजरा केला.
(हेही वाचा – दलाल स्ट्रीट आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवळील चौकात Jawaharlal Darda यांचा बसवणार अर्धपुतळा)
गुजरात राज्यातील सोनगड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 12 नगरसेवक (Corporator) हे मराठी भाषिक मूळ महाराष्ट्रातले असल्याने सोनगड नगरपालिकेवर मराठी माणसांनी खऱ्या अर्थाने भगवा फडकवला आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community