दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी बुधवारी, ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून यात दिल्लीतील मराठी (Marathi) मतदार महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा दावा राष्ट्रीय मराठी मोर्चाचे प्रमुख आणि महाराष्ट्र भाजपाचे (BJP) कार्यकारिणी सदस्य आनंद रेखी यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना केला. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी उद्या निवडणूक होत आहे. जवळवास दीड कोटी मतदार 699 उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा निर्णय करतील. दिल्लीत मराठी (Marathi) माणसांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता या निवडणुकीत मराठी माणूस महत्वाची भूमिका बजावणार अशी चर्चा रंगली आहे. याच कारणामुळे दिल्ली भाजपने (BJP) मराठी प्रकोष्ठ सुरू केला आहे. या मराठी प्रकोष्ठच्या माध्यमातून केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि माजी केंद्रीय अर्थ मंत्री डॉ. भागवत कराड दिल्लीतील मराठी मतदारांना भाजपशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी अलिकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीत बोलाविण्यात आले होते, हे विशेष.
आनंद रेखी यांच्यानुसार, दिल्लीत जवळपास चार लाख मराठी (Marathi) माणसे राहतात. दिल्ली, नोयडा, गाजियाबाद आणि गुरूग्राम अशा विविध भागात ते वास्तव्याला आहेत. मराठी मतदारांबाबत सांगायचे झाले तर, कोंडली या मतदारसंघात मराठी लोकांची संख्या खूप आहे. याशिवाय, पटपटगंज, लक्ष्मीनगर या भागातही मराठी मतदार आहेत. हा मतदार या निवडणुकीत भाजपाला मतदान करून सत्तेच्या सिंहासनावर पोहचविण्यात सिंहाचा वाटा उचलेल, असा विश्वास रेखी यांनी बोलून दाखविला आहे. आनंद रेखी यांनी मराठी (Marathi) लोकांना एकत्र आणण्यासाठी बरेच प्रयत्न सुरु केले आहेत. दिल्लीमधील मराठी मतदारांना भारतीय जनता पक्षाकडे (BJP) वळविण्यासाठी विविध सभा घेतल्या. केजरीवाल यांच्या खोटारडेपणाला कंटाळून भाजपाची सत्ता नक्कीच दिल्लीमध्ये प्रस्थापित होईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला आहे. दिल्लीला प्रगती पथावर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात डबल इंजिनचे सरकार गरजेचे असल्याचे सांगताना ते म्हणाले की, गेली 50 वर्षांपासून मराठी व्यक्ती येथे स्थायिक झाले आहेत. तसेच मोठा अधिकारी वर्ग देखील मतदार आहे.
दिल्ली हे भारतातील प्रमुख राजकीय केंद्र आणि राजधानी आहे. सात लोकसभा आणि 70 विधानसभा मतदारसंघ आहेत. दिल्लीत राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय, संसद भवन, पंतप्रधानांचे निवासस्थान यांसह सर्व केंद्रीय मंत्र्यांची घरे आहेत. येथूनच संपूर्ण देश चालविला जातो. रेड फोर्ट, इंडिया गेट, जामा मशिद, कुतुब मिनार, जंतर मंतर, अक्षरधाम मंदिर, हुमायु टोम्ब, लोटस टेम्पल, बांगला साहिब गुरुद्वारा ही येथे प्रमुख पर्यटकांची ठिकाणे आहेत. दिल्ली बाजारपेठा लाजपत नगर, चांदनी चौक, कॅनॉट प्लेस, सरोजीनी नगर मार्केट, करोल बाग, नेहरू प्लेस, गफर मार्केटमध्ये मोठया प्रमाणात मराठी (Marathi) लोक दिसतात.
देशाच्या राजधानीत मराठी (Marathi) मतदारांची संख्या ब—यापैकी आहे. शिवाय सर्वभाषिक मतदार मोठया प्रमाणात आहे. बंगाली, तेलगू, केरळ, बिहारीं, उडिया, पूर्वाचल अशा अनेक भाषा आणि प्रांत मधील लोकं मोठया प्रमाणात स्थायिक झाले आहेत. त्याचप्रमाणे मराठी लोकं देखील दिल्लीत सर्वत्र आहेत. यातील उच्चपदस्थ मंडळी सोबतच दिल्ली सरकारमध्ये नोकरी करणाऱ्याची संख्याही बऱ्यापैकी आहे. एवढेच नव्हे तर सांगली सातारा येथील 300 च्या वर मराठी (Marathi) कुटुंब फक्त सोन्याचा व्यवसाय करतात. करोलबाग, टिळक नगर, चांदणी चौक, गजियाबाद परिसरात सोन्या चांदीचे मोठी दुकान यांनी थाटलेली आहेत.
Join Our WhatsApp Community