महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवसाच्या निमित्ताने राजकारण्यांवर टीकेची झोड उठवली आहे. रविवारी, (१७ सप्टेंबर) ट्विटरवर पोस्ट करून त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी मराठवाडा क्षेत्रांत पुरेसा पाऊस नसल्यामुळे पुढच्या काही महिन्यांत पाण्यासाठी वणवण बघायला मिळणार असल्याचं भाकितही केलं आहे.
ट्विटरद्वारे दिलेल्या प्रतिक्रियेत राज ठाकरे म्हणाले आहेत की, ‘आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा दिवस. मी मागे पण एकदा म्हणालो होतो, तसं हा दिवस संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा, कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता, तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. , पण हे करताना ‘फोटो -ऑप’ कार्यक्रम साजरे करणं किंवा मराठवाड्यात येऊन आश्वासनांची खैरात वाटणं म्हणजे हा दिवस साजरा केला असं, मानून चालणार नाही. पुरेशा पाण्यासाठी मराठवाड्याचा झगडा गेली कित्येक दशकं सुरू आहे आणि यावेळी मराठवाडा क्षेत्रांत पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे पुढच्या काही महिन्यांत पाण्यासाठी वणवण बघायला मिळणार आहे,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
(हेही करा – Amravati Car Accident : अमरावतीमध्ये कार २०० फूट दरीत कोसळून भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू)
तसेच अशावेळी एकाने आश्वासने द्यायची आणि त्यावर दुसऱ्याने टीका करायची तसेच टीका करणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना नक्की काय केलं याचा विचार करायचा नाही, हे सुरू राहणार असेल, तर मराठवाड्यातील जनतेने आता दोघांनाही प्रश्न विचारायची वेळ आली आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community