मराठवाडा शिक्षक मतदारसंघात शेवटच्या क्षणी ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

138

राज्यात बहुचर्चित असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील पाच जागांवरील निवडणुकांसाठीचा प्रचार शनिवार, २८ जानेवारी रोजी संपला असून आता ३० जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान मराठवाडा शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण शिवसेनेतून निलंबित झालेले ओबीसी नेते जयदत्त क्षीरसागर यांनी अखेर भाजपचे उमेदवार किरण पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

७ फेब्रुवारीला राज्यातील पाच शिक्षक मतदारसंघातील जागांची मुदत संपत आहे. याच जागांवर औरंगाबाद शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे विरुद्ध भाजपचे किरण पाटील यांच्यात मुख्यत लढत होणार आहे. त्यामुळे सध्या विक्रम काळे आणि किरण पाटील यांच्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यादरम्यान या शिक्षक मतदारसंघातील माजी मंत्री आणि शिवसेनेतून निलंबित झालेले नेते जयदत्त क्षीरसागर यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्यामुळे ते कोणाला पाठिंबा देतात याकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले होते. अखेर त्यांनी शेवटच्या क्षणी भाजप किरण पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे.

(हेही वाचा – मुंबईतील जिहादींना नवाब मलिक, अस्लम शेख पोसतात; नितेश राणेंचा गंभीर आरोप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.