Markadwadi तील नियमबाह्य मतदान पोलिसांनी रोखले

97
Markadwadi तील नियमबाह्य मतदान पोलिसांनी रोखले
Markadwadi तील नियमबाह्य मतदान पोलिसांनी रोखले

माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे दि. ३ डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया पार पडत आहे. विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालामध्ये ईव्हीएमबाबत शंका घेत मारकडवाडी (Markadwadi) ग्रामस्थ आक्रमक झाले होते. याबाबत त्यांनी प्रशासनाकडे बॅलेट पेपरवर चाचणी मतदानाची मागणी केली होती. मात्र ही मागणी प्रशासनाने फेटाळली. यानंतर मारकडवाडी (Markadwadi) गावात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. अशातच आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) आणि मारकडवाडी ग्रामस्थ मतदान प्रक्रियेवर ठाम आहेत.

( हेही वाचा : YS Jagan Mohan Reddy यांच्या अडचणी वाढणार; बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी सीबीआय करणार तपास

दरम्यान पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त करण्यात आले. स्थानिक पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, कायद्याची अमंलबजावणी करणे, आमचे कर्तव्य आहे. अशा पद्धतीने नियमबाह्य मतदान होऊ नये यासाठी लोकांना माहिती देत आहोत. मात्र तरीही कायदा भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे विधान पोलिसांनी केले. तसेच गावकऱ्यांनी आणि स्थानिक नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांनी मतदानाला तात्पुरती स्थगिती दिली असून गावकऱ्यांसोबत त्यांची चर्चा सुरु आहे. (Markadwadi)

काय आहे प्रकरण?

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मारकडवाडी (Markadwadi) गावातून भाजपा उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांना मताधिक्य मिळाले. मात्र हे गाव परंपरागतरित्या उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांना मानणारे आहे, असा दावा जानकरांनी केला. त्यामुळे जानकर आणि मोहिते पाटील एकत्र असल्याने या गावातून जानकर यांना मताधिक्य मिळणे अपेक्षित होते. असा गावकऱ्यांचा कयास आहे. मात्र भाजप उमेदवाराला मताधिक्य मिळाल्याने ईव्हीएमबाबत शंका घेऊन मारकडवाडी गावाने बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. पण पोलिस प्रशासनाच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर या मतदानाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.