उत्तर प्रदेश सरकारच्या सामूहिक विवाह योजनेंतर्गत विवाहांमध्ये होत असलेला घोटाळा (Massive Wedding Fraud) समोर आल्यामुळे योगी सरकारवर चौफेर टीका होऊ लागली आहे. सामूहिक विवाह योजनेचे ५१ हजार रुपये हडप करण्यासाठी बनावट नवरदेव उभे करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे आता योगी सरकार सतर्क झाले असून हा गैरप्रकार रोखण्यासाठी सरकार तात्काळ उपाययोजना करण्याच्या तयारीत आहे.
बलिया येथील सामूहिक विवाह योजनेअंतर्गत विवाह लावण्यात आले. त्यामध्ये चक्क विवाहित पुरुष नवरदेव म्हणून सहभागी झाले होते. तसेच एका लाभार्थ्याचा या योजनेत विवाह निश्चित झाला नव्हता तरीही तो बाशिंग बांधून बोहल्यावर चढला होता. या सगळ्या गैरप्रकाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला (Massive Wedding Fraud) आहे. तसेच या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांची होती त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
(हेही वाचा Delhi Riots : दिल्ली दंगलीतील २ धर्मांध मुसलमानांना ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा)
सरकार काय करणार उपाययोजना?
उत्तर प्रदेश सरकारच्या सामूहिक विवाह योजनेतील गैरप्रकार (Massive Wedding Fraud) समोर आल्यानंतर या योजनेतील अनियमितता टाळण्यासाठी या योजनेत नोंदणी केलेल्या उपवर आणि उपवधू यांची पडताळणी अधिक मजबूत करणार आहे. नियमांमध्ये आवश्यक दुरुस्त्या केल्या जातील जेणेकरून उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनाही पडताळणीची जबाबदारी दिली जाईल. सध्याच्या नियमांनुसार, पडताळणीची जबाबदारी ब्लॉक स्तरावरील अधिकाऱ्यांची आहे. राज्य सरकार आता त्यातील ठराविक टक्केवारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी आणि उपसंचालक समाज कल्याण यांच्याकडून ब्लॉक स्तरावर पडताळणी करून पुन्हा पडताळण्याचा विचार करत आहे. समाजकल्याण संचालनालय स्तरावरील अधिकाऱ्यांनाही काही ऐच्छिक पडताळणीची जबाबदारी देण्यात येणार आहे. जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत अनियमितता टाळता येईल.
Join Our WhatsApp Community