माथाडी कामगार नेते संजय निकम यांचा शेकडो कामगारांसह BJP मध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्वागत

48
माथाडी कामगार नेते संजय निकम यांचा शेकडो कामगारांसह BJP मध्ये प्रवेश
  • प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघाचे नेते संजय निकम आणि पोपटराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो माथाडी कामगारांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विशेष उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

माथाडी कामगारांचे मोठे संघटन भाजपात

या प्रवेश सोहळ्याला आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या सोहळ्यात गोपाळ समाजहित महासंघाचे अध्यक्ष संजय गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपात (BJP)  प्रवेश केला.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे मार्गदर्शन

या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नव्या सदस्यांचे स्वागत करताना सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माथाडी कामगार आणि गोपाळ समाजाच्या नेत्यांनी भाजपात (BJP) प्रवेश केला आहे. देव, देश, धर्म आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हे सर्व कार्यकर्ते भाजपासोबत उभे राहिले आहेत. कामगार कल्याणासाठी भाजपा (BJP) कायमच प्रयत्नशील असून नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची हमी मी देतो.”

(हेही वाचा – Mantralaya च्या सुरक्षा जाळीवर उडी घेत तरुणाचं आंदोलन)

२९ हजार माथाडी कुटुंबांचा भाजपाला पाठिंबा

बावनकुळे पुढे म्हणाले, “संजय निकम यांच्या प्रवेशामुळे २९ हजार माथाडी कामगारांची कुटुंबे भाजपाशी (BJP) जोडली गेली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये या पक्षप्रवेशाचा निश्चितच मोठा फायदा होणार आहे.”

रविंद्र चव्हाण यांचे विचार

कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “माथाडी कामगार आणि कष्टकरी वर्गासाठी मोदी सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी भाजपा (BJP) काम करत आहे. गोपाळ समाजही आता मुख्य प्रवाहात येत असून त्यांच्या सर्व समस्या केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

(हेही वाचा – BMC Election : आता ऑक्टोबर, नोव्हेंबर शिवाय महापालिका निवडणुकीला नाही मुहूर्त)

गोपाळ समाजहित महासंघाचा भाजपाला पाठिंबा

या सोहळ्यात राज्य गोपाळ समाजहित महासंघाचे पदाधिकारी गजानन महाजन, बालाजी घोडके, ठाणे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे, उपाध्यक्ष विष्णू नवघरे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दत्ता लोणारे यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला.

भाजपात झालेल्या या शक्तीप्रदर्शनामुळे कामगार व समाजहित संघटनांच्या व्यापक पाठिंब्यामुळे पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये मोठा फायदा होईल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.