आता भाजपचा सेनेला माथेरानमध्ये धक्का! 

मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेने दिलेल्या धक्क्याचा भाजपाने २४ तासांच्या आतच वचपा काढला. मुक्ताईनगरमध्ये खूश झालेल्या शिवसेनेची भाजपाने माथेरानमध्ये परतफेड केली.

121

जळगावातील मुक्ताईनगरमधील भाजपच्या आजीमाजी ७ नगरसेवकांनी भाजपाला सोडचिट्टी दिली आणि त्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेतले. त्यानंतर २४ तासांतच भाजपने शिवसेनेला धक्का दिला आहे. माथेरानमध्ये भाजपने सेनेचे १० विद्यमान नगरसेवक फोडून ते भाजपमध्ये विलीन केले.

यात माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्या सह शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपचे कमळ हाती घेतले. 14 नगरसेवकांपैकी 10 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने माथेरान नगर परिषदेत शिवसेनेची सत्ताच पालटली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या नागसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. कोरोनाचे संकट असले तरी राजकीय पक्षांचे राजकारण काही कमी होताना दिसत नाही. एकमेकांवर कुरघोडी सुरूच असल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे.

(हेही वाचा : मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्या! संभाजी राजेंचे शरद पवारांना आवाहन )

संभाजी राजे भाजपने दिलेला सन्मान सांगत नाहीत! 

भाजपने पक्ष म्हणून संभाजी राजे यांना किती सन्मान दिला, हे संभाजी राजे सांगत नाही. त्यांच्या स्वागतासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले होते. ते शाहू महाराजांचे वंशज आहेत, त्यांना पक्ष कार्यालयात बोलावू नका, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले होते. त्यांचा केलेला सन्मान हा बहुदा इतरांना माहित नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. सध्या संभाजीराजे हे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात ठिकठिकाणी भेट घेत आहेत. त्यात एक वेळेस त्यांनी आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल, तर मी खासदारकीही सोडायला तयार असल्याचे संभाजी राजे म्हणाले होते. तेव्हापासूनच भाजप आणि संभाजी राजे यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरु आहे. यावर संभाजी राजे व्यक्ती म्हणून काय करतात त्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे. आमच्याकडून त्यांच्याबद्दल अपशब्द निघणार नाही, एवढच नाही तर मराठा आरक्षणाच्या लढ्यात नेतृत्व करणाऱ्यासोबत पक्ष झेंडा बाजूला ठेऊन सहभागी होणार, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.