Kunal Kamra : सोमवारी सकाळी मुंबईतील खार पोलीस ठाण्यात (Khar Police Station) स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरुद्ध एफआयआर (FIR against stand-up comedian Kunal Kamra) दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी कामराचा एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये तो उपमुख्यमंत्री शिंदे यांची खिल्ली उडवत एक गाणे गात आहे यासंबंधी शिवसेना प्रवक्ते तथा उपनेते संजय निरुपम यांनी कॉमडीयन कुणाल कामरा याने शिवसेना उबाठाची सुपारी घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर अवमानजनक गाणे केले. कुणाल कामरा हा संजय राऊतचा खास मित्र असून त्याच्या स्टुडिओसाठी मातोश्रीकडून पैसे देण्यात आले. असा दावा संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. (Kunal Kamra)
(हेही वाचा – Kunal Kamra याच्यावर कठोर कारवाई करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधीमंडळात ग्वाही)
कॉमेडीयन कुणाल कामरा याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात कॉमेडी शोमध्ये अवमान जनक गाणे केले होते. या संदर्भात संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत कुणाल कामरा हा संजय राऊतचा खास मित्र असून त्याच्या स्टुडिओसाठी मातोश्रीकडून पैसे देण्यात आले. संजय राऊत आणि उबाठाच्या सांगण्यावरुन कामराने विकृत गाणे केले असा दावा शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला.
तसेच, कुणाल कामरा हा काँग्रेस पक्षाचा एक भाग असून त्याचे राहुल गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी संबंध आहेत असा गंभीर आरोपही निरुपम यांनी केला. दरम्यान, मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय निरूपम म्हणाले की, कुणाल कामराने संविधानातील भाषा स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला आहे. स्टॅंडअप कॉमेडिअन म्हणून शिवीगाळ करणे, निंदा करणे ही कलाकृती नाही तर विकृती आहे. अशा विकृत माणसाला आता शिवसैनिक धडा शिकवणारच. २०२२ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह उठाव केला. या उठावाला लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत लोकांनी स्वीकारले आणि शिवसेनेला भरभरुन मतदान केले असं त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – नवसाक्षरतेच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल; Ullas कार्यक्रमांतर्गत साडेसहा लाख आजी-आजोबांनी दिली परीक्षा! )
कुणाल कामरा याच्या विकृतीचे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पाठराखण केली. कामरा हा राऊतचा खास मित्र आहे. कामरा हा डाव्या विचारसरणीचा कार्यकर्ता असून तो काँग्रेसच्या इकोसिस्टमचा भाग बनला आहे. कामरा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होतो. संजय राऊत, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी कामरा याचे संबंध आहेत. काँग्रेस (Congress) आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून पैसे घेऊन अशा प्रकारची राजकीय नेत्यांची बदनामी करण्याचे काम कामरा करतोय. त्याला उपमुख्यमंत्री शिंदे यांची बदनामी करण्यासाठी उबाठाकडून पैसे देण्यात आल्याचा संशय संजय निरुपम यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community