Mayoral Election: चंदीगड महापौर निवडणुकीत ‘भाजप’चा विजय, आप-कॉंग्रेसला धक्का

भाजपने बाजी मारली असून मनोज सोनकर यांची चंदीगडच्या महापौरपदी निवड झाली आहे. त्यांनी आम आदमी पक्षाचे कुलदीप कुमार यांचा पराभव केला आहे.

235
Mayoral Election: चंदीगड महापौर निवडणुकीत 'भाजप'चा विजय, आप-कॉंग्रेसला धक्का
Mayoral Election: चंदीगड महापौर निवडणुकीत 'भाजप'चा विजय, आप-कॉंग्रेसला धक्का

चंदीगडमध्ये मंगळवारी महापौरपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपने बाजी मारली असून मनोज सोनकर यांची चंदीगडच्या महापौरपदी निवड (Manoj Sonkar elected as Mayor of Chandigarh) झाली आहे. त्यांनी आम आदमी पक्षाचे कुलदीप कुमार यांचा पराभव केला आहे.

सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी एनडीए आणि इंडिया आघाडीतील ही पहिलीच निवडणूक होती. आपने या निवडणुकीत आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला होता.

(हेही वाचा – Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश, भारत सरकारचा युनेस्कोकडे प्रस्ताव)

दरम्यान कडेकोट बंदोबस्तात निवडणूक पार पडली. चंदीगड महापालिकेच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. महापालिकेच्या इमारतीभोवती तिहेरी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी ८०० सैनिक, चंदीगड पोलिसांचे ६०० कर्मचारी, ITPB आणि रॅपिड अॅक्शन फोर्सचे प्रत्येकी १०० कर्मचारी तैनात करण्यात आले होते. महापौरपदाची निवडणूक १८ जानेवारीला होणार होती, मात्र पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांच्या आजारपणामुळे चंदीगड प्रशासनाने निवडणूक ६ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली होती, मात्र कॉंग्रेस आणि आपच्या नगरसेवकांनी या निर्णयाला विरोध केला.

३५ सदस्यांच्या महापालिका सभागृहात आप आणि कॉंग्रेस आघाडीकडे मिळून २० मते असून भाजपच्या १५ मतांपुढे कडवे आव्हान होते. यामध्ये १४ नगरसेवक आणि खासदार किरण खेर यांच्या अतिरिक्त मताचा समावेश होता.

भाजपची बाजी…
चंदीगडच्या महापौरपदाची निवडणूक सकाळी १० वाजता सुरू होणार होती, मात्र पीठासीन अधिकारी अनिल मसिह ३८ मिनिटं उशिरा पोहोचले. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. यावेळी सर्व नगरसेवकांना निवडणूक प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. यानंतर चंदीगडच्या खासदार किरण खेर यांनी पहिलं मतदान केलं. यानंतर प्रभाग क्रमांकावरून इतर नगरसेवकांनी मतदान केलं. सुमारे अडीच तास ही मतदान प्रक्रिया चालली. १२.३० पर्यंत मतदानानंतर मतमोजणी सुरू झाली. यामध्ये भाजपने बाजी मारली.

विनोद तावडेंची रणनिती यशस्वी…
विनोद तावडे यांनी बिहारमध्ये सत्तांतर घडवल्यानंतर पुन्हा ते चंदीगडकडे रवाना झाले होते. गेल्या वर्षीदेखील त्यांनी चंदीगडमध्ये भाजपला विजय मिळवून दिला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.