शरद पवार आणि आशिष शेलार एकत्र निवडणूक लढवणार

113
मुंबई क्रिकेट संघटनेच्या होत असलेल्या निवडणुकीला मोठी कलाटणी मिळाली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना या निवडणुकीत प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता असलेले शरद पवार गट आणि आशिष शेलार गट यांनी युती करत एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय

शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यात चर्चा झाल्यानंतर एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. शरद पवार आणि आशिष शेलार यांचे गट एकत्र आल्याने आता निवडणुकीमध्ये शरद पवार आणि आशिष शेलार असा संयुक्त गट असेल. तसेच ऐनवेळी हे दोन्ही गट एकत्र आल्याने आता शरद पवार गटातील अध्यक्षपदाचे उमेदवार संदीप पाटील यांच्यासह इतर उमेदवारांचे भवितव्य काय असेल, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, निवडणूक लढवत असलेल्या शरद पवार यांच्या गटामध्ये मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे हेही मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक लढवत आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.