भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी सोमवारी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात 100 कोटींच्या मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे. संजय राऊत यांनी आरोप केलेल्या शौचालय घोटाळ्यात आपले नाव घेऊन आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मेधा सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.
मानहानीचा दावा
मीरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीत असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या बांधकामात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना दिलेले हे वक्तव्य आपली बदनामी करणारे आहे. त्यामुळे यासंदर्भात संजय राऊत यांना नोटीस बजावण्यात यावी अशी विनंती मेधा सोमय्या यांनी न्यायालयाला केली आहे. तसेच राऊतांवर मानहानीच्या कारवाईची मागणी देखील त्यांनी आपल्या दाव्यातून केली आहे.
(हेही वाचाः पुण्यातही ‘ज्ञानवापी?’; मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा मनसेचा दावा)
Medha Kirit Somaiya filed Rs100 Crore Defamation Suit against Shivsena Sanjay Raut today Mumbai High Court.
मेधा किरीट सोमैयानी आज मुंबई उच्च न्यायालय येथे शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर 100 कोटींचा दिवाणी मानहानीचा दावा दाखल केला @BJP4India pic.twitter.com/UFlwVIwxz1
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 23, 2022
एफआयआर नोंदवण्याची विनंती
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शिवसेना नेते संजय राऊत कोणत्याही आधाराशिवाय अनूचित विधान करत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे आयपीसीच्या कलम 503,506,509 अंतर्गत शिवसेना नेत्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची विनंती मेधा सोमय्या यांनी न्यायालयाला केली आहे.
Join Our WhatsApp Community