शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांची पक्षाच्या नेतेपदी वर्णी लावली असली तरी अनेक निष्ठावंत शिवसैनिक हे उपनेतेपदी कायम असून त्यांना नेतेपदी बढती देण्याऐवजी बाहेरुन आलेले भास्कर जाधव हे नेते बनले, पण निष्ठावंत आहे तिथेच आहेत. त्यामुळे अनेक उपनेत्यांमध्ये तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली असून शिवसेना उपनेत्या मिना कांबळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. (Shiv Sena UBT Group)
शिवसेना उबाठा गटाच्या शिवसेना कार्यकारिणीचा विस्तारक सहा नवे नेते आणि उपनेते व संघटक पदी नव्या नियुक्त्या जाहीर केल्या. या नव्या कार्यकारिणी विस्तारात खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र वायकर, आमदार सुनील प्रभू आदींची नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर शिवसेना उपनेतेपदी कल्याणचे विजय साळवी, परभणीचे संजय जाधव, कोल्हापूरचे संजय पवार, मुंबईच्या राजुल पटेल, मुंबईच्या शीतल देवरुखकर, सोलापूरचे शरद कोळी, अस्मिता गायकवाड, नाशिकच्या शुभांगी पाटील, कोकणातील जान्हवी सावंत, सातारातील छाया शिंदे यांची नियुक्ती केली आहे. तर पक्षाच्या सचिवपदी वरुण सरदेसाई, साईनाथ दुर्गे आणि सुप्रभा फातर्पेकर आणि पक्षाच्या संघटकपदी विलास वाव्हळ, विलास रुपवते आणि चेतन कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Shiv Sena UBT Group)
शिवसेना उबाठा गटातील काहींची नेते व उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली असली तरी परभणीचे संजय जाधव, सोलापूरचे शरद कोळी यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती केली जाते. परंतु विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, कोकणातील आमदार वैभव नाईक यांना पक्षाच्या कार्यकारिणीत कोणतेही स्थान देण्यात आले नाही. विशेष म्हणजे दहिसरमधील माजी आमदार विनोद घोसाळकर, नाशिकचे बबनरावर घोलप, रविंद्र मिर्लेकर हे शिवसेनेचे उपनेते आहेत. त्यामुळे यापैंकी अनेकांची नेतेपदी नियुक्ती होणे आवश्यक होते. परंतु पक्षाने यासर्वांना उपनेतेपदी कायम ठेवून रविंद्र वायकर, सुनील प्रभू यांची नियुक्ती केली. (Shiv Sena UBT Group)
(हेही वाचा – Sharad Pawar : शरद पवार म्हणतात, सत्य विरुद्ध सत्तेच्या लढाईसाठी राष्ट्रवादी सज्ज)
विशेष म्हणजे, दक्षिण मुंबईतील आमदार अजय चौधरी यांना मागील वेळेस उपनेते बनतील अशी आशा होती, परंतु मागील वेळेस झालेला अपेक्षा भंग यावेळीसही कायम राहिला. तसेच माजी महापौर श्रध्दा जाधव यांनाही उपनेतेपदी नियुक्ती होईल अशी अपेक्षा होती, तोही अपेक्षा भंग झाला आहे. तसेच ज्या दक्षिण मुंबईत भाजपच्या लोढांना टक्कर देण्याचा प्रयत्न करणारे माजी आमदार हे कट्टर शिवसैनिक मानले जात आहेत. परंतु मिर्लेकर यांना उपनेते बनवल्यानंतर नेर्लेकर यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी सोपवली तर दगडू सकपाळ यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली. परंतु यापैंकी नेर्लेकर यांची उपनेतेपदी वर्णी लागली जाण्याची शक्यता होती, पण पक्षाने त्यांचीही दखल घेतली नाही. (Shiv Sena UBT Group)
शिवसेनेत मिना कांबळी, निलम गोऱ्हे, विशाखा राऊत हे पूर्वीपासूनचे शिवसेना उपनेते आहेत. त्यातील निलम गोऱ्हे या पक्ष सोडून गेल्या असल्यातील पक्षातील वरिष्ठ उपनेत्या मिना कांबळी व विशाखा राऊत यांची वर्णी शिवसेना नेतेपदी लागली जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु मिना कांबळी यांना उपनेतेपदी कायम ठेवल्याने अखेर त्यांनी शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला. बुधवारी मिना कांबळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेना उबाठा गटासाठी हा मोठा झटका मानला जात असून रश्मी उध्दव ठाकरे यांची सावली बनून त्यांच्यासोबत वावरणाऱ्या मिना कांबळी यांनी पक्षाला राम राम केल्यामुळे एकप्रकारे हा रश्मी वहिनींसाठी मोठा झटका मानला आहे. (Shiv Sena UBT Group)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community