भाजप महिला प्रमुख सुलताना खान यांच्या गाडीवर हल्ला

89

मीरा रोडच्या भाजप महिला प्रमुख सुलताना समीर खान यांच्या गाडीवर दोन अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री हल्ला केला. या हल्ल्यात सुलताना यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या हल्ल्यानंतर त्यांना तत्काळ इंदिरा गांधी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत.

सुलताना रविवारी रात्री त्यांच्या पतीसोबत कारने कामानिमित्त निघाल्या होत्या. एवढ्यात मीर रोडमधील नया नगरजवळ दुचाकीवरुन तोंडाला रुमान बांधून आलेल्या दोन तरुणांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ करत गाडीवर हल्ला केला. तसेच धारदार शस्त्राने सुलताना त्यांच्यावर हल्ला केला आणि तिथून पळ काढला. सुदैवाने यात फक्त सुलताना यांच्या हाताला दुखापत झाली. यावेळी सुलताना यांच्या पतीने आरडाओरड केल्याने इतर नागरिक तिथे जमा झाले आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांच्या मदतीने त्यांच्या पतीने त्यांना मीरा रोडच्या इंदिरा गांधी हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. तिथे त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडण्यात आले. सुलताना यांना तीन टाके पडल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे.

( हेही वाचा: शरद पवार आता राहिले महापालिकांपुरते…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.