पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यानंतर गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज

171

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर दसरा मेळाव्यात गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. बीडमधील सावरगाव येथे पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होता. मात्र पंकजा मुंडेंचे भाषण होताच कार्यकर्त्यांनी मंचाजवळ धाव घेतली आणि एकच गोंधळ उडाला. मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाल्याने पोलिसांनी यावेळी लाठीचार्जही करावा लागला.

(हेही वाचा – Dasara Melava 2022: दसरा मेळाव्यात सीमोल्लंघन! २ खासदारांसह ५ आमदारांचा शिंदे गटात होणार प्रवेश)

पंकजा मुंडेंच्या भाषणाच्या सुरूवातीलाही काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर परिस्थिती आणखीन चिघळली. या गोंधळाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दसरा मेळाव्याला आलेल्या काही कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासह सेल्फीचा आग्रह धरला. सेल्फी घेण्यासाठी स्टेजकडे धाव घेतली आणि यातून हा गोंधळ उघाडल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, पंकजा मुंडेंच्या या दसरा मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली होती. ज्यावेळी पंकजा मुंडे या भाषणासाठी व्यासपीठावर दाखल झाल्या त्यानंतरही काही हुल्लडबाज तरूणांनी पोलिसांशी हुज्जत घालत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पंकजा मुंडेंनी या कार्यकर्त्यांना व्यासपीठावरून शांत राहण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर हा गोंधळ थांबला. पण ज्यावेळी पंकजा मुंडेंचे भाषण संपले आणि त्या व्यासपीठावरून खाली उतरून आपल्या ताफ्याकडे गेल्या त्यानंतर तरूणांची गर्दी ही व्यासपीठाच्या दिशेने जाऊ लागली. यावेळी समर्थक कार्यकर्त्यांना बाजूला होण्याचे आवाहन पोलिसांनी केले. तरी देखील गर्दी बाजूला न झाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.