‘केवळ शाकाहारी हेच घरे घेऊ शकतात’, अशा जाहिराती मुंबईत अधूनमधून दिसतात. ते जैन समाजाचे बांधकाम व्यावसायिक असतात. या जाहिराती समाजात भेदभाव करताता, असे सांगत त्याला शिवसेना पक्ष पहिला विरोध करते. हा मुंबईत मराठी माणसाच्या न्याय हक्कांवर गदा आहे, अशा शब्दात सेनेने विरोध केलेला आहे. आता त्याच सेनेच्या सत्तेत म्हाडाकडून हाच भेदभाव करणारा प्रकार सुरू आहे. त्यामुळे म्हाडाच्या नावाने शिवसेना टार्गेट होत आहे.
२ हजार घरांचा प्रकल्प
वसईमध्ये पीपीपी तत्वावर आधारीत सुरक्षा स्मार्ट सिटी हा 2 हजार घरांचा गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. म्हाडाच्या सहाय्याने एक खासगी बिल्डर हा प्रकल्प उभारत आहे. मात्र या प्रकल्पामध्ये घर घेण्यासाठी भरावयाच्या अर्जावर एक धक्कादायक रकाना देण्यात आला आहे. येथे घर घरेदी करणाऱ्या अर्जदारांना मांसाहारी की शाकाहारी हा प्रश्न विचारण्यात आला आहे.
(हेही वाचा : हिंदुत्व सोडलेल्या सेनेकडे भाजपा ढुंकून पाहत नाही!)
घरांसाठी लॉटरी काढण्यात आली
या सर्व घरांसाठी लॉटरी काढण्यात आली असून त्यांची किंमत 20 लाख आहे. त्यासाठी विविध वृत्तपत्र आणि ठिकठिकाणी जाहिरातीही देण्यात आल्या आहेत. मात्र ही घरे ज्यांना घ्यायची आहेत त्यांना एक अर्ज भरावा लागणार आहे. या अर्जात तुम्ही मांसाहार करता की नाही’, असे विचारण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रश्नाचे उत्तर देणे अनिवार्य आहे. या अनिवार्य प्रश्नामुळे घर खरेदीदार बुचकाळ्यात पडले आहेत. मासांहाराचा प्रश्न टाकलाच का?, असे काही लोक विचारत आहेत.
Join Our WhatsApp Community