शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी अनिल परब यांच्या १० कोटी २० लाखांच्या संपत्तीवर ईडीने जप्तीची कारवाई केली. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेली मालमत्ता ही साई रिसॉर्टशी संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे. यासोबतच आता अनिल परबांवर म्हाडाकडून सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा : अयोध्येतील राम मंदिर केव्हा तयार होणार? अमित शाहांनी सांगितली तारीख)
किरीट सोमय्यांचे बांधकाम पाडण्यासाठीचे पत्र
शिवसेना उद्धव गटाचे नेते अनिल परब यांचे वांद्रे परिसरात इमारत क्रमांक ५७ आणि ५८ या ठिकाणी कार्यालय आहे. परबांचे हे कार्यालय अनधिकृत असून ते पाडण्यात यावे अशा आशयाचे पत्र भाजपच्या किरीट सोमय्यांनी म्हाडाला दिले आहे. यापूर्वी विलास शेगले या व्यक्तीने सुद्धा हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावं अशी मागणी म्हाडाकडे केली होती. या तक्रारीनंतर अनिल परब यांना २७ जून व २२ जुलै २०१९ रोजी दोन वेळा नोटीस देण्यात आली होती. यानंतर आता पुन्हा एकदा किरीट सोमय्यांनी हे बांधकाम पाडण्यासाठीचे पत्र म्हाडाला दिले आहे.
Join Our WhatsApp Community