BJP : ’माइक्रो मॅनेजमेंट’, हीच भाजपच्या यशाची गुरुकिल्ली

या यशाचे श्रेय पंतप्रधान मोदी यांचे असले तरी भारतीय जनता पक्षाच्या बुथ मॅनेजमेंटच्या नियोजनाला देखील देण्यात येत आहे.

249
BJP : ’माइक्रो मॅनेजमेंट’, हीच भाजपच्या यशाची गुरुकिल्ली
BJP : ’माइक्रो मॅनेजमेंट’, हीच भाजपच्या यशाची गुरुकिल्ली
  • वंदना बर्वे

राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशच्या भरघोष जनादेशामुळे भारतीय जनता पक्षात (BJP) आनंदाची लहर निर्माण झाली आहे. या यशाचे श्रेय पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांचे असले तरी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) बुथ मॅनेजमेंटच्या नियोजनाला देखील देण्यात येत आहे. याशिवाय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मध्यप्रदेश आणि छत्तीसगढची जबाबदारी घेतल्यामुळे देखील भाजपला हे यश मिळाले असल्याची चर्चा राजधानीतील राजकीय वर्तुळात रंगली आहे. (BJP)

तसेच विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेस (Congress) पक्षाजवळ मोदींच्या चेहऱ्याला मात देऊ शकेल असा कुठलाही चेहरा वा नेता नाही. यामुळे भाजपचा विजयीरथ वेगाने देशभर धावताना दिसून येत आहे. शिवाय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांच्या चाणक्यनितीला उत्तर देणारे नियोजनाचा अभाव असल्यामुळे निवडणुकीमध्ये वारंवार हार पत्करावी लागते. छत्तीसगढमध्ये निरुत्साही भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करुन त्यांना जोमाने कामाला लावण्याचे कार्य शहा यांनी केले असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. तर मध्य प्रदेशमध्ये देखील अंतर्गत कलहावर मात करुन भाजपाला अभुतपुर्व यश मिळवुन देण्याचे श्रेय शहा यांच्या नियोजनाला देण्यात येत आहे, हे विशेष. (BJP)

या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने (BJP) बुथ मॅनेजमेंटच्या (Booth Management) माध्यमातुन केलेले कार्य देखील उल्लेखनीय आहे. यामुळे मोदींचा प्रभाव आणि शहा यांचे नियोजन या जोडीला भरघोष यश मिळविणारी जोडी म्हणून भारतीय जनता पक्षाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात उल्लेख केला जाईल, हे विशेष. मध्य प्रदेशात जवळपास ऑक्टोबर महिन्यात प्रत्येक जागेवर लक्ष केंद्रीत करुन निवडणुकीच्या मैदानात शहा सक्रीय झाले होते. प्रत्येक जागेसाठी वेगवेगळी रणनिती आखण्यात आली होती. याच आधारावर उमेदवारांची निवड करण्यात आली होती. (BJP)

(हेही वाचा – Sports Awards Selection Panel : खेलरत्न, राजीव गांधी क्रीडा पुरस्कारासाठीच्या निवड समितीत धनराज, अखिल कुमार आणि कमलेश मेहता)

पक्षातील मोठ्या नेत्यांना निवडणुकीत उमेदवारी देण्याची भुमिका देखील शहा यांनीच पक्षाच्या सभेत मांडली असल्याचे सांगण्यात येत आहे. अगदी सुरुवातीलाच उमेदवारांची यादी जाहीर करणे देखील राजकीय डावपेचांच एक भाग होता. मध्य प्रदेश पेक्षा एकदम वेगळी परिस्थिती छत्तीसगडमध्ये होती. येथे देखील महादेव अॅप घोटाळ्याचा (Mahadev App Scam) पुरेपूर उपयोग करीत, योग्य वेळी योग्य गोष्टी केल्यामुळे भाजपच्या पदरात यश पडले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. एकुणच भाजपच्या (BJP) रणनितीमुळे विरोधकांचे मनोबल कमजोर पडल्यामुळे भारतीय जनता पक्षाला निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादन केले, यात दुमत नाही. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.