एमआयडीसीचे सर्व्हर हॅक… काय आहे हॅकर्सची मागणी?

मागणी पूर्ण केली नाही तर डेटा हॅक करण्यात आलेल्या सर्व्हरवरील सर्व महत्वाचा डेटा नष्ट करण्याची धमकीही हॅकर्सनी दिली आहे.

एमआयडीसीचा सर्व्हर हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच या हॅकर्सकडून पाचशे कोटींची मागणी करण्यात आली असल्याचेही समजत आहे. एमआयडीसीच्या अधिकृत मेल आयडीवर ५०० कोटींच्या मागणीचा मेल आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

हॅकर्सची ५०० कोटींची मागणी

सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत असताना आता थेट महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा(एमआयडीसी) सर्व्हर हॅक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हॅकर्सनी यासंदर्भात पाचशे कोटी रूपयांची मागणी केल्याची माहिती मिळत आहे. मागणी पूर्ण केली नाही तर डेटा हॅक करण्यात आलेल्या सर्व्हरवरील सर्व महत्वाचा डेटा नष्ट करण्याची धमकीही हॅकर्सनी दिल्याचे प्रशासनातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. डेटा रिस्टोर करून यासंदर्भात सायबर सेलकडे तक्रार करावी असं मत सायबर तज्ञांनी व्यक्त केलं आहे.

(हेही वाचाः मिठी नदीत मिळालेल्या नंबर प्लेटचे काय आहे औरंगाबाद कनेक्शन?)

१६ प्रादेशिक कार्यालयातील कामकाज बंद

हॅकर्स देशातील आहेत की परदेशातील आहेत या संदर्भात अजूनही माहिती उपलब्ध झाली नसली, तरी त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र एमआयडीसीच्या डेटा हॅक झाल्याचे समोर येताच एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयात चौकशी सुरू करण्यात आली आहे. सर्व्हरची सिस्टिम व्यवस्थित होईपर्यंत कामकाजाची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी उद्योजकांसह औद्योगिक संघटनांकडून होत आहे. सोमवारपासून एमआयडीसीचा सर्व्हर हॅक झाल्याने राज्यातील मुंबईतील मुख्य कार्यालयासह सोळा प्रादेशिक कार्यालयातील संपूर्ण कामकाज बंद पडले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here