…तर सत्तेवर असताना स्ट्रिट फर्निचरच्या आरोपांची चौकशी का केली नाही?

207
...तर सत्तेवर असताना स्ट्रिट फर्निचरच्या आरोपांची चौकशी का केली नाही?
...तर सत्तेवर असताना स्ट्रिट फर्निचरच्या आरोपांची चौकशी का केली नाही?

स्ट्रीट फर्निचरच्या घोटाळ्याबाबत मी स्वत: आरोप करून तत्कालिन महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पुरावेही सादर केले होते. आता तोच मुद्दा विरोधी पक्षात बसताच शिवसेना उबाठा गटाचे आमदार व माजी मंत्री आदित्य ठाकरे उचलून धरत आहे. परंतु स्ट्रीट फर्निचर प्रकरणात आदित्यजींना जे मी नोंदवलेले जे आक्षेप खरे वाटतात, नेमके त्यांच्या काळात मी पुराव्यासह सादर केलेल्या या आरोपांची साधी दखलही घेतली गेली नाही कि त्याची चौकशी केली नाही, ना साधी कमिटी नेमली. त्यामुळे जनतेच्या घामाचे हजारो कोटी रुपये हे कंत्राटदार, अधिकारी व शासन कर्त्याच्या खिशात घातले का याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे आव्हानच भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी आदित्य ठाकरे यांना केले

जानेवारी २०२३ मध्ये महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांचे लक्ष वेधण्यासाठी २६३ कोटी रुपयांची स्ट्रीट फर्निचरच्या निविदेमध्ये घोटाळा असल्याची माहिती दिली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती दिली. त्यावेळी देवेद्र फडणवीस साहेबांनी यातील अजुन तथ्य शोधण्यासाठी मला सांगितले होते, आठ दिवस अगोदर भी या प्रकरणाची संपूर्ण माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्यानंतर फडणवीसजी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून शासनाने जनतेच्या हिताचा विचार करता ही निविदा व कंत्राटच रद्द करण्यात यावे असा निर्णय घेतला. आमदार रईस शेख यांनीही या प्रकरणांमध्ये पाठपुरावा केला होता, आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणात पाठपुरावा करून सभागृहात व सभागृहाच्या बाहेर माझ्या दिलेल्या पत्राचा उल्लेख केला होता. आणि असेही सांगितले की, मला कुठून तरी फोन आल्यामुळे मी शांत बसलो आहे. पण माझ्या आक्षेपांवर सरकार हे सकारात्मक होते आणि त्यात आणखीन तथ्य शोध करण्यास सांगितले होते म्हणून मी कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हतो,असे कोटेचा यांनी प्रसिध्दीला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

(हेही वाचा – मुंबईत शौचालय बांधणीची निविदा रद्द? कॉर्पोरेट कंपन्यांसाठी नव्याने मागवणार निविदा)

आज मी अभिमानाने सांगू इच्छितो महाराष्ट्र सरकार हे मुंबईच्या जनतेच्या घामाच्या पैशावर कंत्राटदार तथा अधिकारी यांना डल्ला मारू देणार नाही तसेच आदित्य ठाकरे यांना मी विचारू इच्छितो की महाराष्ट्रात आपले सरकार असताना १० पेक्षा जास्त निविदेमध्ये २२०० कोटी च्या कंत्राटात १०००कोटीचा घोटाळा होत होता व त्याचे मी सर्व पुरावे ही सोबत जोडून दिले होते. त्याचे तुम्ही काय केले? स्ट्रीट फर्निचर प्रकरणात आदित्यजींना जे आक्षेप खरे वाटतात नेमके त्यांच्या काळात मी पुराव्यासह सादर केलेले आरोपाबाबत त्याची दखल घेतली नाही किंवा ना चौकशी केली आणि नाही साधी कमिटी नेमली. त्यामुळे जनतेच्या घामाचे हजारो कोटी रुपये है कंत्राटदार, अधिकारी व शासन कर्त्याच्या खिशात घातले का याचे त्यांनी उत्तर द्यावे,असे आव्हानच कोटेचा यांनी देत ही निविदा व कंत्राट रद्द करण्याच्या निर्देश दिल्याबद्दल राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारचे यांचे अभिनंदन केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.