Mihir Kotecha vs Sanjay Patil : कोटेचांचे संजय पाटील यांना खुले आव्हान, म्हणाले या समोर…

ईशान्य मुंबईत भाजपाचे मिहिर कोटेचा आणि शिवसेना उबाठा पक्षाचे संजय दिना पाटील हे निवडणूक रिंगणात उतरले असून हा मतदार संघ विविध कारणांनी चर्चेत येत आहेत.

248
North East LS Constituency : मागील दोन निवडणुकीच्या तुलनेत कोटेचा यांना यंदा करावे लागतात शर्थीचे प्रयत्न

भाजपचे उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभेचे उमेदवार आणि मुलंडचे आमदार मिहिर कोटेचा (Mihir Kotecha) यांनी शनिवारी शिवसेना (उबाठा) चे संजय दिना पाटील यांना खुले आव्हानच दिले आहे. ईशान्य मुंबईच्या विकासाची कळकळ आणि हिम्मत असेल तर त्याअनुषंगाने ईशान्य मुंबईच्या व्हिजनविषयी चर्चा करायला समोरासमोर या असे खुले आव्हानच कोटेचा यांनी दिले आहे. ही चर्चा करण्यासाठी स्थळ आणि वेळ तुम्ही ठरवा असेही कोटेचा यांनी म्हटले आहे. (Mihir Kotecha vs Sanjay Patil)

ईशान्य मुंबईत भाजपाचे मिहिर कोटेचा आणि शिवसेना उबाठा पक्षाचे संजय दिना पाटील हे निवडणूक रिंगणात उतरले असून हा मतदार संघ विविध कारणांनी चर्चेत येत आहेत. आधी कोटेचा यांच्या गाडीचे पोस्टर फाडले, मग त्यांच्या रॅलीवर दगडफेक झाली त्यामुळे या मतदार संघावर विशेष लक्ष असून आता तर संजय पाटील यांनी मोदींचा एकेरी उल्लेख करत टीका केल्याने याचा समाचार कोटेचा यांनी केला आहे. (Mihir Kotecha vs Sanjay Patil)

(हेही वाचा – Mumbai Election Campaign : मुंबईत प्रचाराचा धूमधडाका आठवडा)

शिवाजीनगरचे नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करणे यासाठी प्रयत्न – कोटेचा

याविषयी बोलताना यावेळी कोटेचा (Mihir Kotecha) यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी ही प्रचारासाठी येणार असल्याने शिवसेना उबाठाचे उमेदवार संजय पाटील यांना नुसत्या विचारानेच वेड लागले आहे. त्यामुळे ते बडबडत आहेत. पराभव समोर दिसत असल्यामुळेच पाटील यांचा तोल सुटत चालला असल्यामुळे पाटील हे मा पंतप्रधानांन नरेंद्र मोदी (PM Narendra Mod) यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत आहेत, असे कोटेचा म्हणाले. (Mihir Kotecha vs Sanjay Patil)

ज्या दिवशी मी निवडून येईन, त्यादिवसापासून रात्रंदिवस ईशान्य मुंबईच्या विकासासाठी झटत राहिन. मी प्रथम मानखुर्द शिवाजीनगरचे नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करणे यासाठी माझा प्रयत्न राहील. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशिर्वादाने झाकीर नाईकच्या अवलादींचे सगळे काळे धंदे, ड्रग्ज असो की गुटखा की मटका सगळं बंद करून खऱ्या अर्थाने महाराजांना अभिप्रेत स्वराज्य आणण्याचा माझा प्रयत्न असेल, असे कोटेचा म्हणाले. (Mihir Kotecha vs Sanjay Patil)

(हेही वाचा – Pune Lok Sabha Election 2024 : पुण्यात भाजपाची हॅट्रीक?)

जनतेसमोर वन टू वन चर्चा करायला तयार – कोटेचा 

पुढे बोलताना कोटेचा (Mihir Kotecha) यांनी सांगितले की, प्रेस क्लबद्वारे आयोजित “द मुंबई डिबेट-इलेक्शन २०२४” या कार्यक्रमात आपण मुंबई शहराबद्दल काय व्हिजन आहे हे सादर करायचे होते. माझ्या माहितीप्रमाणे तिथे आयोजकांनी पंधरा फोन केले तरी तुम्ही पळ काढला. हे पहिल्यांदाच नाही तर यापूर्वी अनेक वेळा असा पळ पाटील काढलेला आहे. तरी आपण जे स्थळ आणि वेळ ठरवाल त्याठिकाणी आणि त्यावेळी मी तुमच्याबरोबर उत्तर पूर्व मुंबईच्या विकासाबाबत माझं व्हिजन काय आहे याबाबत सर्व जनतेसमोर वन टू वन चर्चा करायला तयार आहे. असेल हिम्मत तर तुम्ही माझे आव्हान स्वीकाराल आणि पळकुटेपणा बंद कराल, असे खुले आव्हान कोटेचा यांनी दिले. (Mihir Kotecha vs Sanjay Patil)

आमदार म्हणून कोटेचा (Mihir Kotecha) यांची विकासकामांबाबत कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीत सातत्याने विकासाच्या विविध मुद्द्यावर भर देत डम्पिंग ग्राउंड बंद करणे, मेट्रो ४ च्या कामाला गती देणे, भांडुप विक्रोळी येथे मराठी सांस्कृतिक केंद्र निर्माण करणे, हरीओम नगर मधील रहिवाशांना टोल माफी देणे, मुलुंड येथील बर्ड पार्क, मुलुंड येथे रेल्वे टर्मिनस, मुलुंड ते संजय गांधी नॅशनल पार्क येथे रोपवे (केबल कार) यासह अनेक विषय मांडले आहेत. (Mihir Kotecha vs Sanjay Patil)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.