Milind Deora: उद्धव ठाकरेंमुळे मला पक्ष सोडावा लागला, मिलिंद देवरा यांनी असा आरोप का केला?

226
Milind Deora: उद्धव ठाकरेंमुळे मला पक्ष सोडावा लागला, मिलिंद देवरा यांनी असा आरोप का केला?

कॉंग्रेसमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेलेले राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच कॉंग्रेस पक्ष सोडावा लागला, असा गंभीर आरोप मिलिंद देवरा यांनी केला आहे. (Milind Deora)

‘कॉंग्रेस माझ्यासाठी भूतकाळ आहे. मला आता भविष्यात बघायचे आहे. उत्तर मुंबई देशातील सगळ्यात बेस्ट मतदारसंघ आहे आणि त्यामुळे जेव्हा मी कॉंग्रेसमध्ये होतो तेव्हा कॉंग्रेस नेतृत्वाला स्पष्ट सांगितलं की, आपण ही जागा गमवायला नको, पण उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसला खूप जास्त दबाव टाकला आणि त्यामुळे मला बाहेर पडावं लागलं.’, असं मिलिंद देवरा म्हणाले.

(हेही वाचा –Veer Savarkar: स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य, विज्ञान, समाजसेवा, स्मृतीचिन्ह पुरस्कार जाहीर )

”कुठेही घालमेल नाही. काही संदेश नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला संधी दिलेली आहे. मला राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं. त्यामुळे मी फार आनंदी आहे. शिवसेनेच्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार यामिनी जाधव या फायटर आहेत त्या नक्कीच निवडून येतील. याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही”, असा विश्वास शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला.

मोदींचे हात बळकट करण्यासाठी…
”एक प्रकारची ही सगळी विचित्र अवस्था होती. गेल्या 45 वर्षांत कायम देवरा कुटुंबीयांचेच नाव बॅलेट पेपरवर होतं आणि मला गर्व आहे की, मी फॅमिली मेंबरसाठी मतदान केलं नाही तर मी शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मत दिलं. मोदींचे हात बळकट करण्यासाठी मी मत दिलं”, असं मिलिंद देवरा म्हणाले. ”महायुतीकडे 5 पांडव होते आणि या 5 पांडवांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. मी स्वतः एक पांडव आहे. गिरणी कामगारांचा फार जटील प्रश्न आहे. विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी काम करायचं आहे”, असंही मिलिंद देवरा म्हणाले.

…मग जनतेला न्याय मिळणार कसा?
”ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत निवडून येणार नाहीत. 2014, 2019 नंतर त्यांनी काही कामे केली नाहीत. ते मोदी लाटेत निवडून आले. त्यांचा कुठलाही जनसंपर्क नाही. त्या भागात कधी फिरत नाहीत. लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी ते कुठलंही काम करत नाहीत. त्यांनी नागरिकांसाठी कोणतीही बैठक बोलावली नाही. त्यांनी बीएमसीसोबत, म्हाडासोबत बैठक बोलावली नाही. त्यांनी गृहनिर्माण मंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्यासोबत नागरिकांच्या घरांच्या समस्येवर बैठक आयोजित केली नाही. त्यासाठी सकारात्मक पाऊल उचललं नाही. मग जनतेला न्याय मिळणार कसा?”, असा सवाल मिलिंद देवरा यांनी केला.

मिलिंद देवरांचा दावा
”मतदान धीम्या गतीने झालं, असा आरोप करणं हे विरोधकांचं षडयंत्र आहे. आपली हार झाकण्यासाठी हे वक्तव्य करत आहेत. दक्षिण मुंबईमध्ये यामिनी जाधव निवडून येतील आणि मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय होई’, असा दावा मिलिंद देवरा यांनी केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.