Assembly Election 2024 : वरळीतून मिलिंद देवरा यांना उमेदवारी ?

124
Assembly Election 2024 : वरळीतून मिलिंद देवरा यांना उमेदवारी ?
  • प्रतिनिधी

शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा यांना मैदानात उतरविण्याचे घाटत आहे. खुद्द देवरा यांनी शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) यासंदर्भात एक्स या समाज माध्यमात माहिती देऊन आपल्या उमेदवारीचे संकेत दिले. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Mahayuti आणि MNS विधानसभेलाही एकत्र?)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीकरांना न्याय देण्यासाठी मला निवडणुकीला उभे राहण्याची सूचना केली आहे. आम्ही एकत्रपणे वरळी आणि वरळीकरांना न्याय देऊ. वरळीच्या विकासाचे उद्दिष्ट काही वेळातच जाहीर करू. आता वरळीची वेळ आहे, अशा आशयाची पोस्ट देवरा यांनी केली आहे. (Assembly Election 2024)


(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : मनसेची ४ थी यादी जाहीर; ‘या’ उमेदवारांना मिळाली संधी)

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वरळीतून संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने वरळीतून अजून अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. तरीही शिवसेनेचा उमेदवार घोषित झाल्यानंतर वरळीतील लढत तिरंगी होणार आहे. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.