Milind Narvekar यांचे ‘ते’ स्वप्न झाले साकार

386
Milind Narvekar यांचे 'ते' स्वप्न झाले साकार

उबाठाचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या गळ्यात अखेर आमदारकीची माळ पडली आणि मागील वर्षांपासून त्यांचे पाहिलेले स्वप्न साकार झाले. उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक म्हणून असलेली ओळख पुसण्यासाठी नार्वेकर हे मागील अनेक वर्षांपासून आमदारकीची स्वप्न पाहत होते. परंतु कधी बाळासाहेबांमुळे तर कधी पक्षातील नेत्यांमुळे प्रत्येक वेळी आमदारकीच्या स्वप्नालाच सुरुंग लागत असल्याने नार्वेकर यांनी पक्षाचे सचिवपदी वर्णी लावून आपली स्वीय सहायकाची ओळख पुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता पक्षाच्या सचिव पदावर वर्णी लावून घेत आपली खरी ओळख पुसली आता ते विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आल्यामुळे खऱ्या अर्थाने २८ वर्षांपसून असलेली ओळख पुसतानाच आपले स्वप्नही साकार केले. (Milind Narvekar)

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत १२ वा उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक असलेले आणि उबाठा शिवसेनेचे सचिव असलेले मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे निवडून आले. सर्व पक्षातील आमदारांसोबत असलेली मैत्रीचा फायदा उठवत नार्वेकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरस्कृत जयंत पाटील यांच्या पेक्षा अधिक मते मिळवत विजय मिळवला. नार्वेकर हे मालाड लिबर्टी गार्डन परिसरातील शिवसेनेचे गटप्रमुख होते. १९९२मध्ये महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणु कीत नवीन प्रभाग बनल्याने त्या प्रभागाचे शाखाप्रमुखपद मिळवण्यासाठी नार्वेकर हे मातोश्रीमध्ये मुलाखत देण्यासाठी गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शाखाप्रमुख राहायचे आहे की वेगळे काम करायचे असा प्रश्न विचारला. यावर नार्वेकर यांनी तुम्ही द्याल ती जबाबदारी घेईन, सांगाल ते काम करायला आवडेल असे उत्तर देत उध्दव ठाकरेंचे मन जिंकले. तिथून उध्दव ठाकरेंचे स्वीय सहायक बनलेले मिलिंद नार्वेकर हे त्यांचे विश्वासू बनले. उध्दव ठाकरेंची वेळ देणे, नेते कार्यकर्त्यांचे फोन घेणे, दौरे आखणे याची जबाबदारी नार्वेकर यांच्या खांद्यावर आली. एकप्रकारे मिलिंद नार्वेकर यांना उद्धव ठाकरेंनी पूर्ण स्वातंत्र्यच दिले होते. त्यामुळे उध्दव ठाकरे अडचणीत आले किंवा पक्ष म्हणून शिवसेनेसमोर अडचणींची परिस्थिती निर्माण झाली की संकटमोचक म्हणून मिलिंद नार्वेकर यांचे नाव पुढे येई. (Milind Narvekar)

(हेही वाचा – मोठे पक्ष छोट्या पक्षांना संपवून टाकत आहेत; Kapil Patil यांनी व्यक्त केली नाराजी)

नार्वेकरांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत चुरस

उद्धव ठाकरेंचे विश्वासू स्वीय सहायक असलेले नार्वेकर यांची पक्षातील हस्तक्षेप वाढू लागल्यानंतर त्यांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली होती. त्यामुळे विधान परिषदेवर वर्णी लागावी याकरता त्यांनी बाळासाहेब हयात असतानाही प्रयत्न केला होता. परंतु बाळासाहेबांनी त्यावेळी नार्वेकर (Milind Narvekar) यांचा पत्ता कापायला लावला होता, किंबहुना त्यांचे स्वप्न साकार व्हायला दिले नाही. नार्वेकर हे बाळासाहेबांना आवडत नव्हते. परंतु हळूहळू उद्धव ठाकरेंनी पक्ष सांभाळल्यानंतर बाळासाहेबांचा राग कमी व्हायला लागला होता. याच नार्वेकर यांच्या मुळे भास्कर जाधव, नारायण राणे यांच्यासारख्या नेत्यांनी पक्ष सोडला होता. (Milind Narvekar)

तसेच जुलै २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार, खासदारांनी शिवसेनेवरच दावा केल्यानंतर नार्वेकर हे उध्दव ठाकरेंसोबत कायम राहिले. तत्पूर्वी राज्यात ठाकरे सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर यांना बाजुला करत आपल्या स्वीय सहायकांची जबाबदारी राठोड यांच्याकडे सोपवली होती. दरम्यान, नार्वेकर यांनी पक्षाचे सचिवपदी वर्णी लावून घेत आजवर २८ ते २९ वर्षांपासून असलेली ओळख पुसली. त्यातच नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत १२ जागांसाठी सर्व पक्षांनी उमेदवार दिल्यानंतरही उबाठाच्या वतीने मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी उमेदवारी अर्ज भरला. शिवसेना महाविकास आघाडीचा घटक पक्ष होता आणि शरद पवार यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत शेकापचे जयंत पाटील यांना उमेदवारी दिलेली असताना नार्वेकर यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली. परंतु सर्वच आमदारांशी असलेल्या मैत्रीपूर्ण वातावरणामुळे नार्वेकर यांनी जयंत पाटील यांच्या पेक्षा आवश्यक मते आपल्या पारड्यात पाडून घेत विधान परिषदेवर निवडून जाण्याचा मार्ग सुकर केला. नार्वेकर हे विधान परिषद सदस्य म्हणून निवडून येत मागील दहा ते पंधरा वर्षांपासून पाहिलेले स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झाले. (Milind Narvekar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.