मुख्यमंत्र्यांना वाढदिवशी अशाही आल्या शुभेच्छा!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

मिलिंद नार्वेकर…मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक…शाखाप्रमुख बनायचे स्वप्न घेऊन आलेले नार्वेकर आता उद्धव ठाकरे यांचे सर्वात विश्वासू सहकारी आहेत. याच विश्वासू सहकाऱ्याने आपल्या या नेत्याला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मंगळवारी, २७ जुलै रोजी वाढदिवस असून, त्यांना सर्वांनी सकाळपासून शुभेच्छा द्यायला सुरुवात केल्या आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या या नेत्याला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाले नार्वेकर?

सप्टेंबर १९९४ चा नेहमीसारखाच एक दिवस…एक तरुण उद्धवसाहेब ठाकरे यांना भेटला. म्हणाला ‘मला शाखप्रमुख बनायचं आहे.’ साहेब म्हणाले, “शाखाप्रमुख बनायचं आहे की पक्ष देईल ती जबाबदारी घ्यायची आहे?” उद्धवसाहेबांचा शब्द प्रमाण मानून ते देतील ती जबाबदारी घेण्यासाठी तो तरुण तयार झाला. तेव्हापासून उद्धवसाहेबांनी मार्गदर्शन करत, नवे विचार देत, कौतुकाचे बोल आणि प्रसंगी कानउघडणी करत त्या तरुणाप्रमाणे अनेकांच्या आयुष्याला सुयोग्य दिशा दिली. आमच्या या मार्गदर्शकाला, प्रेरणा स्थानाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा’, असे ट्विट मिलिंद नार्वेकर यांनी केले आहे.

(हेही वाचा : जगभरात वाढतोय कोरोना!  भारतातही  आठवड्याभरात रुग्णसंख्या झाली दुप्पट!

नार्वेकरांची ‘अशी’ मातोश्रीत एन्ट्री!

मिलिंद नार्वेकर हे मुळात शिवसैनिक होते. मालाडमधल्या लिबर्टी गार्डन भागातले एक गटप्रमुख अशी त्यांची ओळख. मात्र १९९२ च्या निवडणुकीआधी शाखाप्रमुख पद मिळावे म्हणून नार्वेकर मातोश्रीवर आले होते. तेव्हापासून ते आजतागायत मातोश्रीच्या जवळ आहेत. उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक ते शिवसेना सचिव असा त्यांचा प्रवास राहिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here