शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटले, भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधताना शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांवर खोचक टीका केली. त्याला नार्वेकरांनी मोजक्याच्या शब्दांत ट्विट करत राणेंना एका गोष्टीची आठवण करून दिली.
काय म्हणाले होते नारायण राणे?
कोण ओ मिलिंद नार्वेकर? पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे ते काय? हो, माझ्यासमोरची गोष्ट आहे ओ. मी पाहिलं आहे, बेल मारली की येस सर, काय आणू? असं म्हणणारा आता नेता बनला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे ओ”, अशा शब्दांत नारायण राणे यांनी खिल्ली उडवली होती.
(हेही वाचा राऊतांचा डोळा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर! असे का बोललो नारायण राणे?)
काय म्हणाले नार्वेकर?
यावर मिलिंद नार्वेकर यांनी खोचक शब्दांत ट्विट करत राणेंना उत्तर दिले आहे. नार्वेकर म्हणाले की, बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?
Join Our WhatsApp Communityबॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?@MeNarayanRane
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) February 16, 2022