विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी तब्बल १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान झाले. सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीकडून उभे असलेले शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) पराभूत झाले आहेत. (Vidhan Parishad Election)
विजयी उमेदवारांची यादी
भाजपचे योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे विजयी आणि सदाभाऊ खोत विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या भावना गवळी आणि कृपाल तुमणे हेही विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव विजयी झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे अजित पवार यांना १ जागा गमवावी लागेल, अशी चर्चा चालू होती. असे असूनही राष्ट्रवादीच्या दोन्ही जागा मिळवण्यात अजित पवार यांना यश आले आहे. काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव विजयी झाल्या आहेत. उबाठा गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांचा निकाल दुसऱ्या टप्प्यात आला. त्यामध्ये मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) विजयी झाले आहेत. (Vidhan Parishad Election) याविषयी अधिकृत घोषणा बाकी आहे.
सुधीर मुनगंटीवार यांची ससा-कावसाच्या शर्यतीशी तुलना
“लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर मविआला इतका अहंकार आलाय की, ‘हम करे सो कायदा’ अशी वागणूक आहे. लोकसभा निवडणुकीत एक नरेटिव्ह सेट करून झालं, आता चातुवर्णीयांचे नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न सुरु आहे. स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी जाती-जातीमध्ये विष कालवण्याचे काम मविआ करत आहे. समाजात तेढ निर्माण करायचा प्रयत्न कसा सुरु आहे हे या विधिमंडळाने पाहिलं आहे. पण नेहमी खोटेपणा जिंकत नाही. ससा आणि कासवाच्या शर्यतीत एकदा कासव जिंकलं म्हणून कासवाने असा आव आणायचा की त्याची गती सशापेक्षा जास्त आहे हे हास्यास्पद आहे,” अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community