Milind Narvekar : गेले नार्वेकर कुणीकडे?

उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मागील अनेक वर्षांपासून मिलिंद नार्वेकर स्वीय सहायक असून ठाकरे यांच्या बैठका, दौरे, गाठीभेटींचे नियोजन आणि संदेश पोहोचवण्याची महत्वाची जबाबदारी ही नार्वेकर यांच्याकडे असायची.

450
Milind Narvekar यांचे 'ते' स्वप्न झाले साकार

राजकारणात नेत्यांच्या स्वीय सहायकाला एकप्रकारे ग्लॅमर निर्माण करण्याचे काम जर कुणी केले असेल तर ते म्हणजे मिलिंद नार्वेकर. उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक म्हणून कार्यरत असणारे मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे (Milind Narvekar) यांचे सावली बनून वावरत होते. नार्वेकर यांच्यावर उद्धव ठाकरेंचा एवढा विश्वास आहे की महत्वाची जबाबदारी ही नार्वेकर यांच्याशिवाय कुणावरही सोपवली जात नाही. परंतु उद्धव ठाकरेंची सावली मानली जाणाऱ्या याच नार्वेकरांना आता बाजुला केले जात असून नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या सोबत असले तरी आसपास दिसून येत नाही. त्यामुळे गेले नार्वेकर हे कुणीकडे अशीच विचारणा होत आहे. (Milind Narvekar)

उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मागील अनेक वर्षांपासून मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) स्वीय सहायक असून ठाकरे यांच्या बैठका, दौरे, गाठीभेटींचे नियोजन आणि संदेश पोहोचवण्याची महत्वाची जबाबदारी ही नार्वेकर यांच्याकडे असायची. त्यामुळे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट करण्यासाठी नार्वेकर यांची खुशामस्करी करण्याची वेळ शिवसेनेच्या नेत्यांवर येत होती. उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी नार्वेकर यांच्यासारखा अडथळा पार करणे हे नेत्यांसाठी मोठे होते. मात्र, उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक असताना आमदार होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या नार्वेकर यांचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही. (Milind Narvekar)

शिवसेना फुटल्यानंतर नार्वेकर (Milind Narvekar) हे अजुनच लांब फेकले गेले असून यापूर्वीचे त्यांची सुरक्षा पाहणारे राजपुतच आता स्वीय सहायक कम सुरक्षा रक्षक म्हणून दुहेरी भूमिका पार पाडताना दिसत आहे. त्यामुळे नार्वेकर यांचे महत्व कमी झालेले पहायला मिळत आहे. एरव्ही उद्धव ठाकरे यांच्या भोवती पिंगा घालणारे नार्वेकर हे जरी सोबत असले तरी त्यांच्या आसपास  किंवा महत्वाची जबाबदारी पार पाडताना दिसत नाही. त्यामुळे नार्वेकर यांचे मातोश्रीतील महत्व कमी झाले कि काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Milind Narvekar)

(हेही वाचा – इन्कम टॅक्स रिटर्न घोटाळा प्रकरणी पुरुषोत्तम चव्हाणला ED कडून अटक)

नार्वेकरांचे मातोश्रीसह ठाकरेंच्या कुटुंबातील महत्व झाले कमी…

मागील काही दिवसांपूर्वी नार्वेकर (Milind Narvekar) हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरदार ऐकायला मिळत होती. प्रसार माध्यमांनी या बातमीला एवढे उचलून धरले होते, अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नार्वेकर हे जिथे आहेत तिथे त्यांनी सुखी राहावे अशी प्रतिक्रिया देत हा विषय संपवून टाकला. परंतु त्यानंतरही नार्वेकर हे उबाठा शिवसेनेतील महत्व कमीच झाल्याचे पहायला मिळत आहे. राजपूत यांच्या वाढत्या प्रस्थामुळे आणि प्रामाणिक स्वभावामुळे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांचा राजपुत आणि विनोद ठाकूरवरच अधिक विश्वास दिसून येत आहे. त्यामुळे नार्वेकर यांचे मातोश्रीसह ठाकरेंच्या कुटुंबातील महत्व कमी होताना दिसत असून ठाकरे आता महत्वाच्या बैठकांमध्येही नार्वेकर यांना लांब ठेवत असल्याचे बोलले जात आहे. (Milind Narvekar)

संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या गळ्यातील ताईत बनल्यानंतर त्यांनी नार्वेकर (Milind Narvekar) यांना प्रथम बाजुला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सन २०१९मध्ये सरकार स्थापनेच्यावेळी महाविकास आघाडीच्या बैठकींना राऊत यांनी नार्वेकर यांना बैठकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. राज्यात ठाकरे सरकार आल्यानंतर नार्वेकर हे मुख्यमंत्र्यांच्या दालनात बसत असले तरी पुढे मात्र नार्वेकर यांचे महत्व दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. त्यामुळे उबाठा शिवसेनेत मिलिंद नार्वेकर हे कुठे आहेत असा प्रश्न विचारण्याची वेळच शिवसैनिकांवर आली आहे. (Milind Narvekar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.