गेल्या काही वर्षांमध्ये खाण क्षेत्राखालील भारताचे एकूण भौगोलिक क्षेत्र लक्षणीयरीत्या वाढले आहे आणि हे क्षेत्र प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे देशभरातील 12 दशलक्ष लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे; असे केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले. त्यांनी आंतरराष्ट्रीय भूवैज्ञानिक परिषदेच्या 36 व्या उद्घाटन सत्राला डिजिटल प्रणालीद्वारे संबोधित केले.
उल्लेखनीय प्रगतीची प्रशंसा
जोशी पुढे म्हणाले, की सध्याच्या सरकारच्या काळात खनिज उत्खननाची गती अनेक पटींनी वाढली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला सुयोग्य भर देणा-या खाण क्षेत्रात झालेल्या अलीकडच्या सुधारणा अधोरेखित करत जोशी यांनी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने (GSI) उत्कृष्टतेचे अधिक आयाम गाठण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या उल्लेखनीय प्रगतीची प्रशंसा केली. 36 व्या आंतरराष्ट्रीय भूवैज्ञानिक परिषदेचे महत्त्व विशद करताना, जोशी यांनी विश्वास व्यक्त केला की, भारताने 58 वर्षांनंतर आयोजित केलेला हा तीन दिवसीय कार्यक्रम, शाश्वत विकासाच्या क्षेत्रात अधिक प्रभावी साधने तयार करण्यासाठी जगभरातील भूवैज्ञानिकांना योग्य व्यासपीठ प्रदान करेल.
( हेही वाचा: ‘द काश्मीर फाईल्स’ पाहून येणाऱ्या भाजप खासदारावर बॉम्ब हल्ला )
भारतात पहिल्यांदा झाली होती आयजीसी
2012 मध्ये ब्रिस्बेन येथे झालेल्या 34 व्या आंतरराष्ट्रीय भूवैज्ञानिक काँग्रेसमध्ये 2020 मध्ये भारताने आपल्या प्रादेशिक भागीदारांचे नेतृत्व करत 36 व्या आयजीसीचे आयोजन करण्यासाठी बोली लावली. सध्याची जिओ-सायंटिस्ट काँग्रेस, जी मूळत: 2-8 मार्च 2020 दरम्यान होणार होती, ती कोविड महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली. भारताने 58 वर्षांपूर्वी आयजीसीचे 22 वे सत्र आयोजित केले होते, जे आशियाई भूमीवर होणारे पहिले आयजीसीहोते.
Join Our WhatsApp Community