मंत्री आदित्य ठाकरेंनी जमवली गर्दी, गुन्हा दाखल करणार का? मनसेचा सवाल

महापालिकेने माहीम रेतीबंदराचे सुशोभिकरण केले, त्याचे उदघाटन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

108

राज्य सरकारने दहीहंडी साजरी करू नये, असे निर्देश दिले होते, परंतु सरकार हिंदूंच्याच सणांवर बंदी का आणते, असा मुद्दा उपस्थितीत करत मनसेने राज्यभर दहीहंडी उत्सव साजरा करून सरकारचा निषेध केला. त्यामुळे पोलिसांनी ठिकठिकाणी मनसेचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल केले. मात्र गुरुवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते माहीममध्ये सुशोभित रेतीबंदराचे उदघाटन झाले, त्यावेळीही गर्दी जमली होती. त्यामुळे मंत्री ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करणार का, असा सवाल मनसेने केला आहे.

काय ट्विट केले संदीप देशपांडेंनी? 

‘कोण आला रे कोण आला मुख्यमंत्र्यांच न ऐकणारा मंत्री आला. स्थळ-माहीम2 सप्टेंबर सायंकाळी पाच वाजता. आता मंत्री महोदय,महापौर, वॉर्ड ऑफिसर यांच्यावर गुन्हा दाखल होणार का??’ या ट्विटसोबत देशपांडे यांनी कार्यक्रमात जमलेल्या गर्दीचाही व्हिडिओ जोडला आहे.

(हेही वाचा : जागतिक पातळीवरून हिंदुत्वाचे उच्चाटन करण्यासाठी ‘हे’ रचले आहे षडयंत्र!)

काय होता कार्यक्रम? 

महापालिकेच्या जी/उत्तर विभागातील माहीम रेती बंदर परिसरात अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग केली जात होती. शिवाय किनाऱयाच्या उत्तरेकडील भाग तात्पुरत्या स्वरूपातील बांधकामे आणि झोपडय़ांमुळे बाधित झाला होती. मात्र पालिकेच्या माध्यमातून ही अतिक्रमणे हटवून रेतीबंदर परिसर सुशोभित करण्यात आला आहे. याचे उदघाटन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार सदा सरवणकर, नगरसेवक मिलींद वैद्य, नगरसेविका श्रद्धा जाधव, यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे मनसे आता या विषयाचे राजकारण करणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.