मंत्रिमंडळात आदित्य ठाकरेंचं प्रमोशन, आणखी एका खात्याची जबाबदारी

121

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता शिवसेनेतील जवळपास सगळेच मंत्री हे बंडखोर आमदारांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे या मंत्र्यांकडील खात्यांचे फेरवाटप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे. या नऊ मंत्र्यांच्या खात्यांची जबाबदारी आता महाविकास आघाडीतील इतर मंत्र्यांकडे सोपवण्यात आली आहेत. यामध्ये शिवसेनेचे विधानसभेतील एकमेव मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे अजून एका खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांच्याकडे आता एकूण तीन मंत्रीपदे आहेत.

आदित्य ठाकरेंना नवे मंत्रीपद

रविवारी शिवसेनेचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता त्यांच्याकडील खाते हे आदित्य ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोपवले आहे. तसेच इतर आठ मंत्र्यांकडील खात्यांची जबाबदारी ही महाविकास आघाडीतील इतर मंत्र्यांकडे सोपवली आहे.

(हेही वाचाः ‘मविआ’ सरकारची आणखी एक खेळी, ‘शिंदे गटा’तील मंत्र्यांच्या खात्यांचं फेरवाटप)

एकूण तीन खात्यांची जबाबदारी

मुख्यमंत्र्यांच्या या नव्या खातेवाटपामुळे आता आदित्य ठाकरे यांच्याकडे एकूण तीन मंत्रीपदांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे आधी पर्यटन व पर्यावरण, राजशिष्टाचार या खात्यांची जबाबदारी होती. त्यात आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री हे खात्याची भर पडल्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याकडे तीन मंत्रीपदांची जबाबदारी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.