राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) चौकशासाठी समन्स बजावले होते. त्यानुसार परब यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात अपेक्षित होते. परंतु, त्याऐवजी अनिल परब शिर्डीला रवाना झाले. मात्र ईडी चौकशीला सामोरे जाण्याऐवजी अनिल परब यांनी बुधवारी शिर्डीत जाऊन त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले.
चौकशी टाळून साईबाबांच्या दर्शनासाठी परब
अनिल परब यांना बुधवारी ईडीने चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, अनिल परब हे चौकशी टाळून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. अनिल परब शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दाखल झाले आणि त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले.
(हेही वाचा – अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधणार, मुख्यमंत्री ठाकरे योगी सरकारला पत्र लिहिणार)
समन्स देत चौकशीचे आदेश
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी परबांवर मनी लाँडरिंगचा आरोप करत पुरावे ईडी कार्यालयाकडे सोपवले होते. दापोली इथे परबांना बेकायदेशीर रिसॉर्ट असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांच्या मालमत्तांवर धाडी पडल्या. त्यानंतर परब यांना ईडीने समन्स देत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.