बच्चू कडूंमुळे ‘मविआ’ला काळिमा, काय आहे कारण

125

राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय चांदूर बाजार प्रथम वर्ग न्यायालयाने जाहीर केला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. बच्चू कडू यांच्याविरोधात या प्रकरणी तक्रार दाखल करणारे तत्कालीन नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत संबंधित यंत्रणेकडून माहिती मिळवली होती. यातून हा सर्व प्रकार समोर आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला काळिमा फासले गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.

काय आहे प्रकरण

बच्चू कडू यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅटबद्दलची माहिती लपवणं बच्चू कडू यांना महागात पडल्याची चर्चा आहे. भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी 2017 मध्या बच्चू कडू यांच्याविरोधात याप्रकरणी तक्रार केली होती. बच्चू कडू यांनी मुंबईत 42 लाख 46 हजार रुपयांचा मालकीचा फ्लॅट असतानाही 2014 ची विधानसभा निवडणुकीवेळी या फ्लॅटबद्दलची माहिती निवडणूक आयोगाला दिली नाही, असा आरोप बच्चू कडू यांच्यावर होता. या आरोपांवरुन 2017 मध्ये कडूंविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वे गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने बच्चू कडू यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठवला. तसेच 2 महिने सक्षम कारावासाची शिक्षा दिली.

(हेही वाचा – #Airtel Down: भारतात एअरटेल इंटरनेट, कॉलिंग सेवा ठप्प! जाणून घ्या कारण )

या प्रकरणी 5 वर्ष सुरू होती सुनावणी

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईत म्हाडाच्या यंत्रणेकडून 2011 मध्ये 42 लाख 46 हजार रूपयांत फ्लॅट विकत घेतला होता. बच्चू कडूंनी 19 एप्रिल 2011 रोजी या फ्लॅटचा ताबा घेतला होता. यानंतर बच्चू कडू यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी त्यांनी मुंबईतील त्या मालमत्तेविषयी माहिती निवडणूक आयोगाला ही मालमत्तेविषयी माहिती देणे टाळले होते. हेच लक्षात घेता तक्रारदारांनी बच्चू कडू यांच्याकडून आयोगाची दिशाभूल झाल्याचा ठपका ठेवत तक्रार केली होती. या प्रकरणी 5 वर्षांपासून सुनावणी सुरू होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.